हिदूं मंदिराचे मुस्लिम पुजारी चाचाच्या निधनाने प्रतापपूरच नव्हे तर, आश्वी पंचक्रोशीही हळहळली

0

 मागील २२ वर्षापासून मानमोडे बाबा मंदीरात अखंडीत दिवाबत्ती व पुजाअर्चा

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

देशातील बहुतांशी भागात काही विघ्न संतोषी लोकांकडून समाजा समाजात धार्मिक वाद निर्माण करत या वादाला खतपाणी घालून समाजातील सलोख्याचे वातावरण बिघडवले जात असल्याचे चित्र असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर गावात मात्र अनोखे दृश्य पाहायला मिळाले. येथील हिदूं बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या मानमोडे बाबा मंदिराची मागील २२ वर्षापासून अखंडित सेवा करणारी व काळजी घेणारी व्यक्ती ही मुस्लिम समाजाची होती. या व्यक्तीचे नाव चांदभाई महाराज (चाचा), या चाचांचे  नुकतेचं निधन झाले. गावकऱ्यांनी त्यांचा अत्यंविधी हिदूं रुढी- परंपरेनुसार केला. यावेळी हिंदू बांधवांनी चाचाचा भंडाऱ्याचा (दशक्रिया विधि) कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी हजार ते बाराशे नागरीकानी उपस्थित राहून एक वेगळा व सकारात्मक आदर्श, समाजा समाजात धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांपुढे घालून दिल्याने या ग्रांमस्थाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

          तालुक्यातील प्रतापपूर गावात चांदभाई महाराज (चाचा) हे मागील २२ वर्षांपासून गावातील मानमोडे बाबा, शनिदेव, गणेश व साई मंदिराची देखरेख, पूजापाठ, साफसफाई करण्याबरोबरच मंदिरातील मूर्तीसमोर दिवाबत्ती लावणे असा त्याचा रोजचा दिनक्रम होता. चाचा हे शुध्द शाकाहारी होते. तसेच शनिवार व गुरुवार उपवास देखील ते करायचे. गावातील पाच घरामध्ये भिक्षा मागून ते आपली उपजीविका चालवत होते. याकाळात गणेश गोसावी यांनी चाचांचे मदतनीस म्हणून काम केले.या मुळे प्रतापपूर ग्रामस्थाना नेहमीचं  चांदभाई महाराज यांचे कौतुक राहिले. चाचानी अत्यंत श्रद्धेने मानमोडे बाबा सह इतर देव – देवताचीही सेवा केली. त्याच्या बदल्यात कधीही त्यांनी पैशाची मागणी केली नाही. गावात साजरे होणारे सप्ताह, सण, उत्सव यात ते नेहमी हिररीने सहभागी होत असल्याच्या आठवणी ग्रांमस्थानी जागवल्या. आपल्या हयातीत हिदूं – मुस्लिम धर्मियामध्ये सलोखा निर्माण करत टिकवण्याचे काम चांदभाई महाराजानी केले. त्यांच्या आजारपणाच्या काळात तब्बल १० वर्ष सचिन गजानन गिते व कै. भाऊसाहेब कोडांजी आव्हाड यांनी त्यांच्या दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली होती. कै. निवृत्ती इलग, कै. महादू आंधळे, कै. भिमाजी आंधळे, कै. सदाशिव आंधळे व देवराम बाबा आंधळे यानी चाचाना नेहमी मदत केली.नुकतेचं  चांदभाई महाराज (चाचा) यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे गावातील सर्व ग्रांमस्थानी एकत्र येऊन त्याचा विधिवत हिदूं रुढी-पंरपरेनुसार अत्यंविधी पार पाडला. तसेच दशक्रियाविधी निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करत ह.भ.प बाबासाहेब मगर महाराज यांचे प्रवचन ठेवत महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी प्रतापपूर सह आश्वी पंचक्रोशीतून एक हजार ते बाराशे हिदूं बांधव चाचाना श्रंध्दाजली देण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे एक सकारात्मक संदेश प्रतापपूर ग्रांमस्थानी दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान त्यांच्या निधनानंतर आयोजित भंडाऱ्यावेळी  भगवानराव इलग, सरपंच दत्तात्रय आंधळे, कचेश्वर आंधळे, सचिन गिते, जनार्धन डोगंरे, दिनकर आंधळे, भाऊसाहेब सांगळे, शंकर खामकर, शंकर सांगळे, सुखदेव आंधळे, रंगनाथ आंधळे, बाळकृष्ण आंधळे, सुरेश इलग, भिमा सांगळे, बबन घुगे, विठ्ठल आंधळे, गजानन आव्हाड, बाळासाहेब सांगळे, मधुकर सांगळे, पांडुरंग आंधळे, बाळासाहेब गिते, श्रीधर आंधळे, सुधाकर सांगळे, आण्णासाहेब गिते, तुळशीराम आव्हाड, मुक्ताबाबा बिडवे, भाऊसाहेब बर्डे, अंकुश कांबळे, संजय घाडगे व मानमोडे बाबा शैनेश्वर मित्र मंडळाचे सर्व सदंस्य, ग्रामस्थं तसेच पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने आलेले नागरीक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here