ही तर डबक्यात समाधान मानणारी वृत्ती..; उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना पुन्हा डिवचले

0

सातारा : सातारा पालिकेची नवीन इमारत बांधण्यामागे अधिकारी कर्मचारी यांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी हे प्रशस्त कार्यालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पण, याची कल्पना आपल्या सारख्या डबक्यातच समाधान मानणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तींना येणार नाही, असा टोसा खासदार उदयनराजे भोसले  यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना लगावला आहे
सातारा नगरपालिकेतील भ्रष्ट कारभारावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन दिवसांपूर्वी बोट ठेवत उदयनराजे व त्यांच्या सातारा विकास आघाडीवर टीकेची झोड उठवली होती. त्याला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ”तुमची राजकीय कारकिर्द आमदारकीपासून आणि आमची नगरसेवक पदापासून झाली, ही वस्तुस्थिती बदलणारी नाही.
समाजसेवा करत असताना नगरसेवक पदापासून कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना नेहमीच समाजभान असते. अशा व्यक्ती नेहमी जमिनीवर राहतात. आपल्याला एकदम आमदारकी मिळालेली आहे. आपल्यात हाच फरक आहे हे आम्ही बोलून दाखवले. त्याचवेळेस आम्ही केलेले आव्हान स्विकारण्याऐवजी त्यापासून पलायन करुन, पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करत आपणच आपली पाठ थोपटवून घ्यायचे बिनकामाचे उद्योग बंद करावेत, असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे.

नगरपरिषदेतल्या ज्या अधिका-यांनी पैसे खाल्ले ते एसीबीच्या ट्रॅपमध्ये पकडले गेले. त्यामुळे त्यांचे समर्थन आम्ही यापूर्वी केले नव्हते आणि आजही करीत नाही. सातारा नगरपालिकेची प्रशस्त इमारत असावी, अशी आवश्यकता आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीला वाटणार नाही हे आम्हाला पटतंय. पण सातारकरांच्या कार्यक्षम सेवांसाठी ते आवश्यक आहे.

<p>आज अ वर्ग नगरपरिषद आहे, शहराची लोकसंख्या सुमारे दोन लाखापर्यंत आहे. भविष्याचा विचार करता, तीन लाख लोकसंख्या असली तर महापालिकेचा दर्जा मिळतो. भविष्याचा विचार करुन, आम्ही प्रशासकीय इमारतीची उभारणी करीत आहोत. अधिकारी कर्मचारी यांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी, प्रशस्त कार्यालय आवश्यक असते याची कल्पना आपल्या सारख्या डबक्यातच समाधान मानणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तींना येणार नाही. सातारकरांसाठी ही इमारत आवश्यक असल्याने आम्ही ती मार्गी लावत आहोत. त्यासाठी सत्तर कोटी नाही तर आणखी काही रक्कम लागली तरी त्याची तरतुद आम्ही करुन घेऊ, त्याची काळजी तुम्ही करु नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

<p>या इमारतीच्या जागेची सुमारे ४० गुंठे जागा, नगरपरिषदेच्या नावावर होण्यासाठी दानशुर बाबासाहेब कल्याणी यांच्याकडून नाममात्र खरेदीपत्राव्दारे रितसर हस्तांतरीत करुन घेतली आहे. कोट्यावधींची जागा नाममात्र किंमतीत नगरपरिषदेच्या नावे करण्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. या ठिकाणावर आरक्षण बदलून रितसर जागा खरेदी केली आहे. पूर्वी येथे ऑडिटोरियमचे आरक्षण होते. कै. भाऊसाहेब महाराजांनी कायम ठेवले होते असे तुम्ही सांगत आहात.

आता ऑडीटोरियम बांधण्यात मर्यादा आल्या आहेत. होम थिअटरचे माध्यमातुन सर्व कार्यक्रम बघितले जातात. साताऱ्यातील थिएटर्स बंद पडत आहेत. तसेच डि.सी.सी बँकेचा भव्य ऑडिटोरियम आज त्या जागे लगत आहे. त्यामुळे कालबाहय झालेल्या गोष्टींमध्ये दूरदर्शीपणाने बदल करुन त्याची अंमलबजावणी देखील सातारकरांच्या हितासाठी केली तर त्यात रडवेलेपणा करण्याचेकाही कारण नाही. उदयनराजेंनी म्हंटले की, राजपथावरचा उजेड करंज्यात पडल्याचे तुम्हाला दिसले यावरुन तुमची खुजी वृत्तीच दिसत आहे. अशा शब्दांत त्यांनी शिवेंद्रराजेंवर निशाणा साधला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here