सातारा : घोणसपूर,ता. महाबळेश्वर येथील ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. कोंडीराम जंगम यांना नुकताच कासरूड याठिकाणी बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार आदर्श शिक्षक बाजीराव कारंडे (बिरवाडी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जंगमबाबा यांनी शुन्यातून व्यवसाय वाढवून खऱ्या अर्थाने विश्व निर्माण केले आहे. यापूर्वी अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत. नव्वदीकडे झुकलेले असले तरी बिना चष्म्याचा वापर करून वाचन कला अद्याप जोपासलेली आहे.यावेळी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,सरपंच संतोष जंगम,सचिन मालुसरे (शिरवली), ओमकार कारंडे,राज मालुसरे, राकेश कांबळे, विजय कांबळे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार ह.भ.प.कोंडीराम जंगम यांना प्रदान करताना बाजीराव कारंडे शेजारी मान्यवर व कार्यकर्ते.