१० ते १५ वर्ष अनुदानाच्या प्रतीक्षेतील पीडित विना अनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानावर आठव्या दिवशी आंदोलन..

0

येवला -प्रतिनिधी

 आज ना उद्या अनुदान मिळेल, पुर्ण वेतन सुरु होईल या आशेवर गेल्या 20 वर्षापासून विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नोकरी करत आहेत. निवेदन, आंदोलन, उपोषण, पायी दिंडी च्या माध्यमातून लढा दिल्यानंतर कसेबसे काही शाळेना 20टक्के 40टक्के अनुदान मिळाले आहे. मात्र आई वडीलांच्या औषधोपचार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, डोक्यावर असणारे सावकारी कर्ज आणि संसाराचा उदरनिर्वाह करताना सध्या मिळणारे तुटपुंजे वेतन व शिल्लक राहिलेली नोकरी, वय अपुरे  ठरणार आहे, ठरत आहे. त्यामुळे आमच्या घरात कसली दिवाळी अशी प्रतिक्रिया मैदानावर उपस्थित शिक्षक देत आहेत. सर्व विनाअनुदानित शाळा आणि वर्ग तुकड्या वरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पध्दतीने अनुदान देण्याची कार्यवाही मायबाप शिंदे सरकारने पूर्ण केल्यास आम्हाला दिलासा मिळणार आहे अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचे सुत्र येत्या मंत्रिमंडळ बैठकीत लागू न केल्यास शासनाच्या दारात म्हणजेच मुंबई येथील आझाद मैदानात काळी दिवाळी साजरी करु असा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिली आहे.* 

        *राज्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग व तुकड्या वरील 65 हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक समन्वय संघाने पुकारलेल्या 10 ऑक्टोबर पासूनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद राज्य सरकारने दिला नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत शिक्षक आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.* 

              *राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदार मा.डॉ.सुधीर तांबे,मा.विक्रम काळे,मा.बाळाराम पाटील मा.अभीजीत वंजारी इतर आमदार महोदायांनी शिक्षक समन्वय संघाच्या महायल्गार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री मा.दीपक केसरकर यांची भेट घेऊन अनुदानाबाबत चर्चा केली.पण मंत्री महोदयांकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने उपरोक्त आमदार हे 18 तारखेपासून विधान भवन येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहेत.*

*नाशिक विभागातून त्रुटीपात्र, अघोषित ,20 टक्के व 40 टक्के वेतन अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झाले आहेत. व उर्वरित शिक्षक मैदानावर दाखल होत आहेत. अनुदानित तथा अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांची परवड थांबणार आहे की नाही अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कंटाळून आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली असून हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बिनपगारी सेवानिवृत्त झाले आहेत. तरी ही मायबाप सरकारला पाझर फुटत नाही. परिणामी यंदाही आमच्या घरात कसली आली दिवाळी अशी उद्विग्न भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त करत आहेत.* 

*प्रतिक्रिया*

*विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी अनेक आंदोलने, उपोषणे केली. प्रश्न सुटला नाही. अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. अनेकांनी आत्महत्या करुन जिवन संपवली. पुरोगामी महाराष्ट्रात ह्या शिक्षकांचे हाल खूपच दयनीय झाली आहे. मायबाप शिंदे सरकारने 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक टप्पा वाढ अनुदान सूत्रानुसार वेतन अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय करून राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व लाखो कुंटुबियांना न्याय द्यावा व शिक्षकांची दिवाळी गोड करावी.*

*प्रा.श्री.कर्तारसिंग ठाकूर*

*राज्य सह सचिव*

(उच्च माध्यमिक कमवी शिक्षक शिक्षकेत्तर संघटना, महाराष्ट्र राज्य)

*समन्वयक*

(शिक्षक समन्वय संघ.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here