उत्तर-मध्य मुंबईतून अ‍ॅड उज्ज्वल निकम यांना भाजपचे तिकीट

0

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं असून, त्यांच्या जागी उज्वल निकम यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. उज्वल निकम यांची लढत आता काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी होईल. काँग्रेसनं दोनच दिवसांपूर्वी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे निकम आणि गायकवाड आणि निकम यांच्यात सरळ होणार असल्यचे आता स्पष्ट झाले आहे.

उज्ज्वल निकम खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. मला कल्पना आहे की राजकारण हे माझ्यासाठी नवीन क्षेत्र आहे. या देशातील कायदा सक्षम व्हावा आणि देशद्रोह्यांविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी यासाठी मी काम करणार आहे.

“माझा जन्म हा हनुमान जयंतीला झाला आहे त्यामुळे मी आत्तापर्यंत देशाच्या सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अनेक खटले चालवले. त्यामुळे मी कुठलंही आव्हान पेलवू शकतो.”

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. मला कल्पना आहे की राजकारण हे माझ्यासाठी नवीन क्षेत्र आहे. या देशातील कायदा सक्षम व्हावा आणि देशद्रोह्यांविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी यासाठी मी काम करणार आहे.

“माझा जन्म हा हनुमान जयंतीला झाला आहे त्यामुळे मी आत्तापर्यंत देशाच्या सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अनेक खटले चालवले. त्यामुळे मी कुठलंही आव्हान पेलवू शकतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here