संजीवनी एमबीएच्या सहा विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी निवड

0

   ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार आगेकुच
कोपरगांव: संजीवनी एमबीए कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभाग विविध कंपन्यांच्या संपर्कात राहुन कंपन्यांची काय गरज आहे, याचा साकल्याने अभ्यास करून तसे प्रशिक्षण  आपल्या विद्यार्थ्यांना देतो. याचीच परीनिती म्हणुन अलिकडेच टी अँड  पी विभागाच्या प्रयत्नाने विविध कंपन्यांनी अंतिम परीक्षा व निकाला अगोदरच सहा विद्यार्थ्यांना चांगले वार्षिक  पॅकेज देवुन नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे. अशा  पध्दतीने टी अँड  पी विभागाची दमदार आगेकुच सुरू असुन प्रत्येक प्रयत्नाला यश  मिळत असल्याचे संजीवनी एमबीएने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
          पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनीच्या एमबीए विभागाला स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त असल्यामुळे कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार  अभ्यासक्रमाची रचना करण्यात येते. तसेच टी अँड पी विभाग मुलाखतींची संपुर्ण तयारी करून घेतो. या सर्व बाबींमुळे संजीवनीचे विद्यार्थी जॉब रेडी होतात आणि कंपन्यांच्या कसोट्यांमध्ये  सहज उतरतात. मागील वर्षी १००  टक्के विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  देण्यात आल्या. याही वर्षी  त्या दिशेने  वाटचाल चालु आहे.
       अलिकडेच गेनर इंडियाने निशिगंधा  बाळासाहेब देशमुख हिची, वेस्ट कोस्टने श्रीकांत निरंजन जावळे व कुणाल दिलीप कालेकरची, डी मार्टने प्रसाद संजय नाईकची आणि डेसिमल पॉईंटने अभिषेक  दत्तात्रय पवार व शुभम राजेंद्र राऊत यांची निवड केली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.


 मी शिर्डी येथिल रहिवासी असुन वडील शेतकरी आहे. संजीवनी मधुन एमबीए केल्यावर संजीवनीच नोकरी देते हा विश्वास  मला व माझ्या वडीलांना होता, म्हणुनच मी संजीवनी एमबीए मध्ये मार्केटींग अँड  ऑपरेशन विषयात शिक्षण  पुर्ण केले. कंपनीला जे ज्ञान पाहीजे होते, ते सर्व मला एमबीए करीत असताना मिळाले. मला जशी  कंपनी पाहीजे होती, तशी  एमबीएच्या टी अँड  पी विभागाने मिळवुन दिली. माझी वेस्ट कोस्ट या औषधनिर्माण कंपनीने मुलाखत घेतली आणि लागलीच नोकरीसाठी निवड  केली. मी कंपनीच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट टीम मध्ये सेवेत हजर देखिल झालो. अद्याप अंतिम निकाल येणे आहे, तरी मला नोकरी मिळाली, हे सर्व संजीवनीमुळे शक्य झाले.-विद्यार्थी कुणाल कालेकर.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here