966 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्या त्या कंपनीला राज्यात 4 कंत्राटं,

0
पामिरेड्डी पिच्ची रेड्डी
फोटो कॅप्शन,कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या पामिरेड्डी पिच्ची रेड्डी यांनी 1989 मध्ये मेघा इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना केली.

पुणे : मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरलेल्या इलेक्ट्रोल बॉण्ड प्रकरणातील सर्वाधिक इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेघा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीने आणखीन चार नवीन सरकारी कंत्राटं मिळवली आहेत. या सर्व प्रकरणाला इलेक्ट्रोल बॉण्डची पार्शवभूमी असल्याने अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीतर्फे पुणे रिंग रोड आणि विरार अलिबाग बहुद्देशीय मार्ग या कामांच्या निविदा मंगळवारी (21 मे) ला खुल्या कारण्यात आल्या.

मेघा इंजिनियरिंगने या कामांपैकी एकूण चार काम मिळवली असून, आता पुणे रिंग रोडचे तीन टप्प्यांचे काम आणि विरार अलिबाग रस्त्याचं पहिल्या टप्प्याचं काम ही कंपनी करणार आहे.

निवडणूक आयोगाने SBI कडून इलेक्टोरल बाँडसंबंधी मिळालेली माहिती आपल्या वेबसाईटवर सार्वजनिक होती.

ही नावं प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात बरीच कामे केलेल्या मेघा इंजिनियरिंग या कंपनीचं नाव चर्चेत आलं होतं. हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने छोट्या कंत्राटदारीपासून सुरुवात केली होती, ती कंपनी आता देशातील सर्वात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे.

यापूर्वीदेखील मेघा इंजिनिअरिंगने महाराष्ट्रातील कामं केलेली आहेत. महाराष्ट्रातील ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचं काम मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. हा 14 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here