सरकार दरबारी केली मागणी, दहा वर्षे होत आली तरी न्याय मिळेना.

0

बारामती: वाणेवाडी ता बारामती येथील बाळासाहेब आनंदराव जगताप वय वर्ष 63 हे स्वतः पाटबंधारे खात्यातूनच सेवा निवृत्त झालेले आहेत, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार वाणेवाडी तालुका बारामती येथील मुरूम चर क्रमांक तीन ही पाटबंधारे संशोधन व जलनिस्सारण उपविभाग माळेगाव बारामती यांच्या अखत्यारितील आहे. त्या चारीवरील गट नंबर 685 च्या पश्चिम बाजूला एका इसमाने अतिक्रमण केले आहे व शासकीय जागेत वहिवाट सुरू केलेली आहे या गोष्टीला आठ ते दहा वर्षे होऊन गेली यासंदर्भात जे अतिक्रमण झाले आहे ते काढून टाकण्याबाबत  ११/०५/२०१५  पासून आज पर्यंत संबंधित विभागाला पाठपुरावा करत आहे परंतु आत्तापर्यंत ते अतिक्रमण काढलेले नाही सदर इसमाचे याचा त्याच गटावर पश्चिम बाजूला क्षेत्र आहे परंतु त्यांनी पूर्वीकडील बाजूला बाळासाहेब जगताप यांच्या बाजूला अतिक्रमण केलेले आहे व काही श्रेत्र काबीज केले आहे व त्या ठिकाणी ते वहिवाट करत आहेत, 

शेजारील बाळासाहेब जगताप यांच्या येण्या जाण्याचा मार्ग बंद करून ते त्यांना नाहक त्रास देत आहेत या संदर्भात जगताप यांनी संबंधित विभागाला व पोलिसात 2015 पासून अर्ज करून मोजणी करून सर्व गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे अगदी कलेक्टर पासून लोक आयुक्तांपर्यंत अर्ज करून या सर्व गोष्टी समोर मांडलेल्या आहेत या सर्वांनी आदेश देऊनही सदर इसमाने केलेले अतिक्रमण काढून जागा रिकामी करावी असे आदेश असतानाही त्यावर प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही, 

आज अखेर पर्यंत असे काहीही घडले नाही यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे, 

तरीही आजपर्यंत काहीच कारवाई होताना दिसत नाही म्हणून मी याबाबत शेवटची विनंती वजा मागणी करून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा तसेच उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहे असे मत श्री बाळासाहेब जगताप यांनी यावेळी व्यक्त केले. 

ज्या खात्यासाठी आयुष्यातील 30-35 वर्ष सेवा म्हणून दिली सेवा म्हणून केली त्याच खात्याकडून माझ्या तक्रारीवर विचार केला जात नाही याची खंत माझ्या मनात आहे अशी ही त्यांनी भावना व्यक्त केली.

माझ्यासारख्या व्यक्तीला न्यायासाठी एवढ्या वर्ष प्रतीक्षा करायला लावणे हे माझ्या नशिबी असेल तर सामान्यांची काय अवस्था होत असेल याविषयी विचार होणे गरजेचे आहे, 

एखाद्या व्यक्तीला वेळेत न्याय न मिळणे हा अन्याय आहे असे कायदा सांगतो मग आज मी नऊ वर्षे झाले या अतिक्रमणाविषयी शासनाच्या लक्षात आणून देऊनही कोणतीही कारवाई होत नाही हा माझ्यावर अन्याय नाही का?  असाही माझा प्रश्न आहे? येणार्‍या एक महिन्यात माझ्या तक्रारीवर योग्य तो निर्णय नाही झाला तर तिव्र उपोषणाचा इशाराही जगताप यांनी दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here