आयसीसीच्या टी-२० साठी समालोचकांच्या (कॉमेंटेटोर)यादीत चार भारतीयांना संधी

0

दुबई : आगामी टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने समालोचकांच्या नावांची घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषक 2024साठी भारतातील चार समालोचकांची निवड करण्यात आलेली आहे.

हर्षा भोगले, दिनेश कार्तिक, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांना विश्वचषकात समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. यासोबत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन, इयान स्मिथ, मेल जोन्स आणि वेस्ट इंडिजच्या इयान बिशप यांनाही या टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे.

याव्यतिरिक्त डेल स्टेन, ग्रॅहम स्मिथ, मायकल अथरटन, वकार युनूस, सायमन डूल, शॉन पोलॉक आणि केटी मार्टिन यांनाही यात संधी देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here