माजी मंत्री बबनराव घोलप यांचे शिवसेनेच्या मतदारांना आवाहन
संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळालाच शिवसेनेच्या मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख तथा राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस पक्ष यांची महाविकास आघाडी झालेली आहे. सदर निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार शेतकरी विकास मंडळा सोबत निवडणुकीत उभे आहेत. शेतकरी विकास मंडळाची निशाणी कपबशी आहे. यासाठी सर्व शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य असलेल्या मतदारांना बबनराव घोलप यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे की, शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे व आघाडी धर्म पाळावा. जर कोणी शिवसेनेच्या नावाने इतर विरोधी गटातील व्यक्ती मते मागत असतील तर त्यांना दूर करावे. शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, असे परखड मत देखील शिवसेना पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्क बबनराव घोलप यांनी व्यक्त केले.