येवला प्रतिनिधी
येवला तालुक्यातील गेले अनेक दिवसांपासून आदिवासी समाज बांधवांना विविध समस्यां ना सामोरे जावे लागते,म्हणून “एक तीर एक कमान आदिवासी सब समान” या मोहिमे अंतर्गत येवला तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी येवला तहसील आबा महाजन यांची तहसील कार्यालयात भेट घेतली व विधिध समस्यां साठी निवेदन दिले
,त्यात शिधापत्रिका असतांनाही धान्य वितरीत होत नाही,शबरी आवास योजने साठी नवीन रेशन कार्ड वितरीत करण्यात यावे,अतिक्रमण असलेल्या गायरान व वन विभागाच्या जमिनी नावावर करण्यात यावे,अश्या प्रकारच्या सर्व मागण्या बाबत निवेदन देण्यात आले आहे,तसेच तहसीलदार यांनी या मागण्यासाठी निवेदन कर्त्यांना मार्गदर्शन केले,व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.या वेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊराव आहेर,दत्तू मोरे,राजु पवार,संतोष सोनवणे,अरुण मोरे यांच्या सह तालुक्यातील आदीवासी समाज्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,व सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते…