ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या  वाढदिवसानिमित्ताने फळे वाटप करून स्वाभिमान दिवस साजरा.

0

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.संपूर्ण राज्यात ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

रायगड  जिल्ह्यातील उरण तालूक्यात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा व अनेक सामाजिक संस्थाच्या वतीने सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व अतिशय उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी मावळ लोकसभेचे खासदार उमेदवार राजाराम पाटील ,भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका अध्यक्ष अमोल शेजवळ, सरकारी हाॕस्पीटल डिन डॉ.कालेल , वंचित कार्यकर्ते ओव्हाळ ,माजी कोषाध्यक्ष रघुनाथ बागुल, बसपा अध्यक्ष सुनील गायकवाड , संघटक प्रभाकर जाधव, वंचित संघटक लखन , उपाध्यक्ष विश्वतेज कांबळे , लोंढे सर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विविध सामाजिक उपक्रमातून तळागाळात पोहोचविण्यासाठी तालुकाध्यक्ष तुकाराम खंडागळे हे विशेष मेहनत घेत आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन व नियोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here