दौड रावणगाव, परशुराम निखळे : महान तत्वज्ञानी,न्यायप्रिय,उत्तम प्रशासक महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी 300 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच सौ.पुनम मदने यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.गावातील श्रीराम विद्यालयामध्ये इयत्ता 10 वी मध्ये विशेष गुण प्राप्त करून प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या कु.प्रणिता धनाजी मत्रे,पृथ्वीराज बापू सरोदे,साक्षी अशोक ननवरे,या विद्यार्थ्यांचा तसेच गावातील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांना घडविण्यासाठी उत्तमरीत्या काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनीस,तसेच गावातील नागरिकांना आरोग्यसेवा देऊन,जनजागृती करणाऱ्या परिचारिका,आशा सेविका या सर्व नारिशक्तीचा अहिल्यारत्न पुरस्काराणे सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी उपस्थित विद्यार्थी,पालक,सर्व कर्मचारी यांनी प्रथमच अशा प्रकारे मिळालेल्या सन्मानाने आनंद व्यक्त केला व आभार मानले.
यावेळी उपस्थित सरपंच सौ पुनम मदने,उपसरपंच प्रकाश होले,ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे,ग्रा.सदस्य धनाजी मत्रे,चंद्रकांत होले, चेअरमन अजीज भाई शेख,किसन भोरे,भागवत शेंद्रे,काका मदने,रविकुमार लांडगे, पोपट कुचेकर,अरुण विघ्ने,ग्रामस्थ,आदी मान्यवर उपस्थित होते.धनाजी मत्रे,अनिता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती लोंढे यांनी केले.मच्छिंद्र मदने यांनी अभिनंदन करून आभार मानले.यानंतर घेण्यात आलेली ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या महिलांचा झाला सन्मान-इंताज मुलाणी,छाया होले,शितल कांबळे,नंदा भोसले,ज्ञानेश्वरी गुरव,अनिता शिंदे, कमल पोटे, विद्यार्थी— प्रणिता मत्रे,पृथ्वीराज सरोदे,साक्षी ननवरे