सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा रुग्णालयात करोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले. साताऱ्यात अडीच वर्षानंतर करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यापैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एक महिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती.
कोरोनाग्रस्त झाल्यानंतर अंतिम स्तरावर या महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर येथील रुग्णालयातील करोना वार्ड मध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारात असताना आज त्यांचा मृत्यू झाला. या महिला रहिमतपूर येथील होत्या.
नागरिकांनी कोरोनाला घाबरून जाऊ नये
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे कोरोना वाढत आहे त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात सध्या करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात आणि कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती ठीक आहे.
सातारा येथील उपचारासाठी दाखल असलेली महिला सत्तर वर्षाची आहे आणि त्यांना त्रास झाल्यानंतर शेवटच्या स्तरावर आजार असताना रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण चाळीस वर्षाचा पुरुष आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना इतर कोणताही त्रास नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांनी सांगितले. या आजाराची वेगळी अशी काही लक्षणे नाहीत. सर्दी ताप खोकला कणकणी अशी लक्षणे आहेत.
कोरोनासंदर्भात मोठी अपडेट! ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ रुग्णांचा मृत्यू; कोणत्या राज्यात किती बाधित?
जिल्हा रुग्णालयातील सध्याच्या डॉक्टरांनी करोना मध्ये काम केलेले आहे. करोना एक आणि करोना दोनचा डॉक्टरांना अनुभव आहे. नागरिकांनी लसीकरण केलेले असल्यामुळे तसेच सध्या नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती ही वाढलेली आहे. जिल्हा रुग्णालयात व इतरत्रही करोना विरोधात लढण्यासाठी सर्व तयारी केलेली आहे.
व्हेंटिलेटर ऑक्सिजन आणि इतर व्यवस्था केलेली आहे. सर्व औषधे उपलब्ध आहेत. सातारा जिल्हा रुग्णालयात वीस खटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. तिथे सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. करोनामध्ये आपण ज्याप्रमाणे काळजी घेत होतो. त्याप्रमाणे गर्दीत चालणे टाळावे. मूखपट्टी (मास्क) वापरावी, साबणाने हात स्वच्छ धुवावे. आदि निर्देश त्यांनी दिले.नागरिकांनी या आजाराला घाबरून जाऊ नये. करोनामध्ये घेत होतो तशी काळजी व खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे
५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद
देशात कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले आहेत आणि आता ही संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. याचप्रकरणी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनी सांगितले की, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी एका आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे.