म रा मराठी पत्रकार संघाच्या कार्यलायाला भेट
जामखेड तालुका प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक तत्वनिष्ठ, आदर्शवादी, शूर, सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे जीवन कार्य पुढील अनेक पिढ्यांसह देशाला मार्गदर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गार अहिल्यादेवींचे वंशज युवराज भूषणसिंह राजे होळकर यांनी काढले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने अहिल्यादेवींचे वंशज युवराज भूषणसिंह राजे होळकर यांनी सकाळी चोंडी येथे जाऊन दर्शन घेतले त्यानंतर ते जामखेड दौऱ्यावर होते यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ओंकार दळवी,उपाध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग माने, कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले,जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे,वकील संघाचे अध्यक्ष ऍड प्रमोद राऊत,चेतन राळेभात,श्रीधर सिंध्देश्वर, संजय फुटाणे विशाल लोळगे,मयूर भोसले सर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण जीवन कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन शौर्य, समाजसुधारणा, आदर्श राजकारण, न्याय, सर्व धर्म समभाव जपणारे आहे. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले असून, ब्रिटिश लेखकांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. धर्मशाळा, विहिरी, बारव याचबरोबर केदारनाथ मंदिर त्यांनी उभे केले. त्यांच्या जीवनाला संत हे विशेषण सार्थ आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल,अहिल्यादेवी होळकर या उत्तम प्रशासक होत्या. गुलामगिरीच्या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले. सरकारने त्यांच्या या विचारांचे अनुकरण केले पाहिजे. आरक्षणाबाबत धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे. अलौकिक व्यक्तिमत्व असणाऱ्या अहिल्यादेवींचे एक चांगली स्मारक व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी पत्रकार ओंकार दळवी यांनी त्याचा सत्कार केला