सहवीज निर्मितीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येईल -आ.आशुतोष काळे

0
भूमिपूजन सहवीज निर्मिती .jpeg

काळे कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

कोळपेवाडी प्रतिनिधी:- सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. त्याचा फायदा कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. आजवर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस दरात कधीही मागे न राहता जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर दिला आहे. व यापुढील काळात सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मिळणाऱ्या अधिकच्या उत्पन्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येईल असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यतेखाली व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या मा.संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते शनिवार (दि.३१) रोजी संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे योग्य दाम मिळवून देवून सहकाराची पाळमूळ खोलवर रुजविण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी उभारलेल्या कारखान्याच्या माध्यमातून कोळपेवाडी व परिसराचे नंदनवन झाले आहे.काळाच्या ओघात होत असलेले बदल स्विकारतांना नवीन कारखान्याची निर्मिती करून यशस्वीपणे गळीत हंगाम घेत आहोत आणि सर्वच प्रकारच्या खर्चात बचत होत आहे याचे मोठे समाधान वाटते. मागील गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी लवकरच सहवीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचे सुतोवाच केले होते. त्याची पूर्तता करतांना आज प्रत्यक्षात सहवीज निर्मिती प्रकल्पाबरोबरच भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे कारखान्याच्या प्रगतीबरोबरच ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांचे देखील कल्याण होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.  

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ,अॅड.राहुल रोहमारे, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सौ.वत्सलाबाई जाधव, सौ.इंदुबाई शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने, प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,डेप्यु.सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन सेक्रेटरी बाबा सय्यद यांनी केले तर आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here