उध्दव बोराटे;फलटण : अंध ,अपंग दिव्यांगांच्या क्षेत्रात केलेला कार्याची दखल घेऊन गोखळी (फलटण ) येथील सागर आत्माराम गावडे पाटील यांना संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान 2025 अंतर्गत पुणे विभागातून संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कराड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्छुभाऊ कडू यांच्याहस्ते सागर गावडे पाटील यांना संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सागर गावडे, वडील आत्माराम गावडे, आई शकुंतला गावडे यांनी पुरस्काराचा स्विकार केला.
अंध, अपंग, दिव्यांग, विधवा परितक्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, दरवर्षी बच्छुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन, कोरोना साथीच्या काळात कोरोना विलिगिकरण कक्ष उभारणी, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना पुस्तके, ग्रंथ वितरण आदी सामाजिक कार्याची दखल घेऊन सागर गावडे पाटील यांची संत गाडगेबाबा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य समन्वयक गौरव दादा जाधव, संताजी धनाजी अभियान प्रमुख महेश बडे, पुणे विभागीय निरीक्षक प्रशांत देवताळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी, प्रहार दिव्यांग संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दादा ढमाळ, शिवाजी चव्हाण, महेश शिंदे, बगले प्रशांत, शुभम उबाळे, समीना शेख, महेश जगताप, आनंदा पोतेकर, सुभाष मुळीक, चंद्रकांत नाळे, बापूराव खरात, अशोक गोतपागर आत्माराम गावडे, सौ. शकुंतला गावडे , राहुल गावडे, राजेंद्र फाळके, महेंद्र गावडे, दत्ता पवार, संग्राम इंगळे, ज्ञानदेव काशिद, दिलावर शेख, रमेश शिंदे, गणेश गावडे, बापूराव माने, पांडुरंग जाधव, प्रसाद गावडे तसेच दिव्यांग महिला ज्येष्ठ नागरिक इत्यादी उपस्थित होते.