अनिल वीर सातारा : राष्ट्र सेवा दल स्थापना दिनानिमित्त बुधवार दि.४ रोजी येथील हुतात्मा स्मारक क्रांती चौक येथे सकाळी ९।। वा. ध्वजारोहण,१०।। वा. देशभक्तीपर गाणी व व्याख्यान होणार आहेत.
मंगळवार दि.११ रोजी सानेगुरुजी स्मृतीदिनानिमित्त कवी संमेलन व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.अध्यक्षस्थान डॉ. आबासाहेब उमाप भूषवणार असून निवेदकाचे काम डॉ.आनंद साठे करणार आहेत.दुपारी १२ वा.सेवा सैनिक दल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थान ऍड.वर्षाताई देशपांडे भूषवणार आहेत.यावेळी विलास किरोते यांची प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास सम्बधितांनी वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन डॉ.आनंद साठे यांनी केले आहे.