महत्वाकांक्षी प्रकल्पाचे शनिवारी भूमिपूजन ; कार्यक्रमास दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार
………………………………………………………………
माहूर :-(बालाजी कोंडे) माहूर गडावर तब्बल 52 कोटी रुपये खर्च करून लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा येत्या शनिवारी (ता.20)केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माहूर गडावर येणार असल्याने शहरातील सर्व रस्ते चकचकीत करण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे.
केंद्रीय मार्ग निधी सड़क परिवहन मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मंजुर झालेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुका देवी मंदिर परिसरात लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकाम भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक २० मे रोजी सकाळी १० वाजता माहूर-पुसद रोड वर इंडियन ऑईल पेट्रोल पंपच्या समोर आयोजित करण्यात आला आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड तथा अध्यक्ष श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष नागेश न्हावकर हे राहणार आहेत.
तर नांदेडचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर,हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील,लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे,आ.सतीश चव्हाण,आ.विक्रम काळे,राम पाटील रातोळीकर ,आ.भीमराव केराम, आ.माधवराव पाटील जवळगावकर,आ.डॉ.तुषार राठोड, आ.श्यामसुंदर शिंदे,आ.मोहन हंबर्डे,आ.बालाजी कल्याणकर, आ.राजेश पवार,आ.जितेंश आनंतापूरकर, माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून भव्य असे सभा मंडप उभारण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागा कडून नियोजन सुरू आहे.
महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याने शहरातील सर्व रस्ते चकचकीत करण्यात आले आहेत.
Home महाराष्ट्र माहूर गडावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लिफ्ट-स्कायवॉकच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार