नगर :- कोतवाली पोलिस स्टेशन येथे फिर्यादी नितीन दत्तात्रय चिपाडे यांचे फिर्यादीवरुन महेंद्र संतोष उपाध्याय यांचे विरुद्ध भा.दं.वि.कलम 307, 323, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला. यातील फिर्यादी हे त्यांचे पैशाचे तगाद्यासाठी गेले असता महेंद्र उपाध्याय व आणखी एकजण यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण करुन खुन करण्याचा प्रयत्न केला. सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर महेंद्र संतोष उपाध्याय यांनी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला असता, त्याची सुनावणी होऊन तो फेटाळण्यात आला. मूळ फिर्यादी नितीन चिपाडे यांचेतर्फे अॅड.सतिशचंद्र सुद्रीक यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे अॅड.श्रीमती थोरात यांनी काम पाहिले.