मनमाड : शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार सुहास कांदे यांनी संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आमदार सुहास कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे,शहर प्रमुख मयूर बोरसे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सचिन पटेल पाणीपुरवठा विभागाचे काजवे व संबंधित अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
यावेळी बैठकीमध्ये पाणी टंचाईचे करणे जाणून अधिकाऱ्यांना त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार कांदे यांनी केल्या . तसेच सद्यस्थितीत होत असलेले समारंभ व इतर अत्यावश्यक बाबींसाठी योग्य ती पावती घेऊन पाणी उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. येणारे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन हे पूर्ण क्षमतेने व संपूर्णपणे मिळवण्यासाठी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्याना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. सोबतच वॉलमन ची बैठक घेऊन वाया जाणारे पाण्याचे नियोजन करण्यासाठी सूचना करण्यात आल्या.
बैठकीतील विशेष मुद्दे :
1) पाणी रोटेशन कधी येणार तोपर्यंत ची व्यवस्था करणे. सध्या पाणी किती दिवस पुरेल.
2) रोज नगरपालिका ट्रॅक्टर चालू करून समारंभ व इतर जरुरी ठिकाणी देण्यासाठी पावती घेऊन पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे.
3) वॉलमनची बैठक घेऊन वाया जाणारे पाणी पुरवठा नियोजन करण्यासाठी सूचना देणे.
4) रोटेशन लवकर मिळण्यासाठी इरिगेशनच्या गोवर्धने साहेब व अधिकारी वर्गाशी बोलून जास्त प्रमाणात पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
बैठकीस उपस्थित सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गास नागरिकांची गैरसोय होऊ नये व सुरळीत पाणीपुरवठा व्हावे म्हणून सूचना केल्यानंतर लवकरच मनमाड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.