उद्घाटक – सुषमाताई अंधारे*१० वी १२ वी उत्तीर्ण गुणवंताना प्रमाणपत्र वाटप
सातारा/अनिल वीर : भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन संलग्न सातारा जिल्हा ओबीसी संघटना सातारा जिल्हा अधिवेशन रविवार दि.४ रोजी सकाळी १० वा.येथील संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था कामाठीपुरा येथे आयोजन करण्यात आले आहे.
नेत्या सुषमाताई अंधारे उद्घाटक असून विलास काळे प्रमुख पाहुणे आहेत. डॉ.ज्ञानेश्वर गोरे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.स्वागताध्यक्ष म्हणून शहराध्यक्ष श्रीकांत आंबेकर असून संयोजक जिल्हाध्यक्ष भारत लोकरे आहेत.माजी जिल्हाध्यक्ष नेताजी गुरव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या कार्यक्रमातच इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या अध्ययनार्थीना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.तेव्हा ओबीसी,एस सी,एसटी,एनटी व व्हीजीएनटी विद्यार्थ्यांनी पालकांच्या समवेत अधिवेशनात नाव नोंदणी प्रत्यक्ष हजर राहून करावी.असेही आवाहन जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी केले आहे.