प्रत्येकानी सुंदर दिसाव व यासाठी फेस योगाचा प्रचार ….

0

आंतरराष्टीय योग दिवस हा प्रत्येक वर्षी २१ जून ला साजरा केला जातो. २०१५ साली २१ मे रोजी प्रथमतःआंतरराष्ट्रीय स्तरावर योगा दिवस साजरा करायला तेव्हा प्रारंभ झला जेव्हा नरेंद्र मोदी यानी २७ सेप्टेंबर २०१४ साली एका सभेत हा दिवस साजरा करण्यासाठी सर्वप्रथम प्रस्ताव मांडन्यात आला. ज्यात नरेंद्र मोदी असे म्हणाले होते की योग ही आपल्या प्राचीन परंपरेकडून प्राप्त झलेला अनमोल वारसा आहे, योग केल्यामुळे आपन नेहमी निरोगी राहतो, योग करुन आपले विचार, कृती, भावना यांच्यावर आपण नियंत्रण प्राप्त करु शकतो आणी आपल्या रोजच्या जीवनशैलित बदल घडवून चेतना निर्माण करुण हवमानातील कुठल्याही बदलास सहजपणे सामोरे जावू शकतो,,. नरेंद्र मोदी यांच्या ह्याच प्रस्तावास २०१४ मधे ११ डिसेम्बर रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एकूण १९३ पैकी १७५ देशानी या प्रस्तावास होकार दीला . २१ जून हा वर्षभरातील एक सगळ्यात मोठा दिवस असतो, या दिवसी सूर्य लवकर उगवतो व उशिरा मावळतो .वैदिक गणितात असे दिले आहे की उन्ह!लि संक्रांति नंतर सूर्य दक्षिणायन होत असतो आणी हा काळ आध्यात्मिक सिद्धि प्राप्त करण्यासाठी एक उत्तम काळ मानला जातो, नियमित योगा केल्यामुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त होते, शरीराची प्रतिकारक्षमता वाढते, शरीराची उर्जा वाढून आपन कुठलही काम अधिक क्षमतेने करू शकतो. शरीर लठ होत नाही,शुगर, बी पी, पचन सस्था संबंधी कुठलही आजार होत नाही, मन शांत राहते, एकाग्रता वाढते.जागतिक योग दिननिमित विशिष्ट रूपरेखा आखन्यात येते ,रूपरेखा समजून घेवून त्यामगिल उद्देश्य दरवर्षी जानून घेतला जातो आणी वर्षभर त्याचे पालन करण्यात येते ,२०१७ आरोग्य साठी (yoga for Heath), २०१८ शांततेसाठी योग( yoga for peace),२०१९ हृदयसाठी योग (yoga for Heart) ,२०२० कौटुंबिक योग(yoga for Home and family) ,२०२१ कल्याणकारी योग ( yoga for well being) ,२०२२ मानवतेसाठी योग(yoga for Huminity) साजरा करण्यात आला. योगासने, योगजीवन, योगदृष्टि,योगसाधना अशा विविध संकल्पना पूर्वीपासुन प्रचलित आहे, आध्यात्मिक क्षेत्रात विशेष गती करावयाची असल्यास योग दृष्टिचा आचार व विचार अवलम्बला जाते. योग म्हणजे एकात्मता, एकता आशा विविध संकल्पना योगविषयी सांगत येतील. सर्व जीवश्रुष्टि ही एकमेकांशी जोडली गेलेली असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव मणजे योग,मानवी जीवनाची अत्यंत उच्च स्तिथी योग दृष्टीने प्राप्त होवू शकते. भारतात योगन्यानअतिप्राचीन काळापासून उपलब्ध आहे. योगा मधे यम ,नियम, प्रत्यहार, द्यान,आसन,भक्ति, ध्यान अशा बाबी समाविष्ट आहेत. योग हा वैदिक साहित्यचा भाग आहे. जो पाच हजार वर्षपूर्वी महर्षि पतंजलि द्वारा संपादित करण्यात आला. हे एक आध्यात्मिक व शारिरिक शास्र आहे . साधारणपणे योगासन व प्राणायाम पर्येत योगाचा अर्थ लोकाना समजतो. पण योगाचे अनेक प्रकार आहे. हटयोग शतकर्म,आसन, मुद्रा, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, आणी समाधि हे हटयोगाचे सात अंग आहे . याद्वारे कुंडलिनी शक्ति आणी चक्रे जागृत होतात ,हटयोग ही मनाला जगाकडे जाण्यापासून रोखून अंतर्मुख करण्याची एक प्राचीन भारतातील प्रथा आहे. रोजयोग यालाच राजश्री योग म्हणतात, त्याचे आठ भाग मानले जातात. ही आठ अंगे म्हणजे यम, नियम, आसन,प्राणायाम, ध्यान, धारण,समाधी आठ अंगे असल्यामुळे त्याला अष्टांगयोग देखील म्हणतात. इतर योग साधनंपेक्षा यामधे अधिक शिस्त आहे.कर्मयोग कर्मयोग म्हणजे निस्वार्थी कृती यामधे मनावतेला शरण जावे लागते. अशा स्थितीत मनाची अलिप्तता करुन कार्य केले जाते. भगवतगीतेत कर्मयोगाचे महत्व सांगितले आहे. भक्तियोग यामधे भक्तिमार्गचे वर्णन केले आहे ,याद्वारे प्रत्येकामध्ये देव पाहणे ,त्याचा भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग सांगितला आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पदसेवा,अर्चना, वंदन, दास्य, सख्या आणी आत्मनिवेदन हे नऊ भाग आहे. ध्यान योग या योगामुळे मनातिल नकारात्मक उर्जा मुक्त होते. यामधे ग्रंथ यांच्या अभ्यासातून बुद्धिचा विकास होतो. या योगाची तीन तत्व आहेत. आत्मसाक्षात्कार, अहंकार दूर करणे ,योगसनाची अनेक प्रकार आहेत. भुजंगासन, शलभासन, अनुरासन,नोंवकासन,द्विपादासन,उत्तानासन, सर्वांगासन, मत्यायन, हलासन, पवनमुक्तासन, शवासन, पद्मासन, धनुरासन, वक्रासन, वज्रासन, वृक्षासन, वीरासन, त्रिकोणासन, शीर्षासन आदी या सर्वांमुळे शरीर व मन निरोगी राहन्यास मदत होते . आपल्या व्यक्तिमत्वच प्रतीबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. आपल्या शरीरावर सगळ्यात जास्त मसल्स हे आपल्या चेहऱ्यावर असतात व तो सुंदर दिसावा यासाठी फेसयोग आहे. म्हंणजे चेहरच्या स्नायुचा व्यायाम होय . चेहरा सुंदर दिसावा अस प्रत्येकाला वाटत असते . मात्र यासाठी फेस योगा आहे हेच बऱ्याच लोकाना माहिती नाही. यासाठी डॉ अशोक गावित्रे (सै!दर्य शास्र तज्ञ्) यांनी ब्यूटीफुल फेस ऑफ इंडियन हे मिशन सुरु केले असून याचा उद्देश हा प्रत्येकानी सुंदर दिसाव व यासाठी फेस योगाचा प्रचार व प्रसार करणे हा आहे. यावर त्यानी अतिशय सोप्या भाषेत समजेल असे पुस्तत देखील लिहिले असून लवकरच त्याच प्रकाशन योगगुरु रामदेव बाबा यांच्या हस्ते करणार असल्याच त्यानी सांगितले. डॉ अशोक गावित्रे (Tricology and cosmetologist)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here