राष्ट्रभाषानुरागी शिक्षक पतसंस्थेचा कर्ज व्याजदर पावनेदहा टक्यावर !

0

सातारा/अनिल वीर  : राष्ट्रभाषानुरागी शिक्षक – शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजदर दहा टक्यावरून पावने दहा टक्के व सभासद ठेवीवरील व्याजदर सव्वानऊ टक्यावरून नऊ टक्के इतका करण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेण्यात आला.

   संस्थेने कर्जाचे दोन टप्पे केलेले असून दहा लाखापर्यंत कर्जाचा व्याजदर १० टक्के ऐवजी आता पावने दहा टक्के राहील. दहा लाखाचे वर २५ लाखापर्यंत कर्ज व्याजदर सव्वा दहा टक्यावरून दहा टक्के इतका कमी करणेत आला आहे. तसेच ठेवीवरील सर्वसाधारण व्याजदर आता पावणे नऊ टक्के राहील. तर जेष्ठ नागरिक सभासदांसाठी तो नऊ टक्के इतका निश्चित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन हणमंत सूर्यवंशी यांनी दिली.संस्थेचे संस्थापक ता. का. सूयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचे कामकाज अत्यंत पारदर्शी व काटकसरीने चालले असून व्हाईस चेअरमन कुमार सोनवलकर, सेक्रेटरी विजय यादव व सर्व संचालकांचे उत्कृष्ट सहकार्य लाभत असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

     संस्थेचे २९०० सभासद असून १६ कोटी भागभांडवल आहे. २० कोटी इतक्या सभासदांच्या ठेवी असून ४० कोटी खेळते भांडवल आहे. दरमहा दोन ते अडीच कोटी कर्ज वाटप केले जाते. येणे कर्ज सुमारे ४१ कोटी आहे. कर्ज मर्यादा २५ लाखावरून ३० लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे.फक्त चौदा वर्षाच्या कालावधीत संस्थने गरूड झेप घेतली असून काटकसरीच्या व भ्रष्टाचारमुक्त कारभारामुळे जिल्ह्यामधील ही अग्रणी संस्था म्हणून नावारूपाला येत आहे. ही संस्था सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ ठरावी यासाठी सर्वच स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत. कर्जाचा व्याजदर कमी केला असला तरी लाभांश मात्र १० टक्याच्यावर सतत राहील याची काळजी घेतली जात आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये माजी चेअरमन म यांचे चांगले सहकार्य लाभत असुन व्यवस्थापक व कर्मचारी संस्थेच्या प्रगतीसाठी झोकून देवून काम करत असल्याचे व्हा.चेअरमन कुमार सोनवलकर यांनी सांगितले.

कर्ज व ठेवीवरील नवीन व्याजदराची अंमलबजावणी १ ऑगष्ट पासून करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक नवनाथ शिंदे यांनी दिली. लवकरच संस्थेचे कार्यक्षत्र लगतच्या पाच- सहा जिल्ह्यापर्यंत वाढविण्याचे नियोजन झाल्याचे चेअरमन सूर्यवंशी यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here