सिन्नर : योगाचे महत्व आणि आजार जागतिक योग दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत योगासनास सुरुवात करून स्वतःसाठी दिवसातील किमान एक तास काढावा असे आवाहन प्रा. : एस बी देशमुख यांनी केले .
जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दरवर्षी २१ जून हा दिवस आपण जागतिक योग दिन म्हणून देशभरात साजरा करतो. योग प्राचीन शास्त्र किंवा विद्या आहे. योग या शब्दाचा अर्थ एकमेकांशी जोडले जाणे. शरीर व मन जोडले गेल्याने आपल्याला , मानसिक , भावनिक संतुलन प्राप्त करता . यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन आयुष्यात सर्वांगीण प्रगती करता येते तसेच आरोग्याच्या दृष्टीने योगाचे फायदे ही भरपूर आहेत. योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांची कार्यक्षमता , व्यक्तीचा जीवन विषयक दृष्टिकोन सकारात्मक होतो, रक्त शुद्ध व प्रवाही राहते,. श्वसन संस्था सुधारल्याने प्राणवायूचा पुरवठा अधिक प्रमाणात होऊन कामात उत्साह वाढतो आणि थकवा येत नाही. म्हणजेच व्यक्तीची कार्यक्षमता वाढते ,रोग प्रतिबंधक शक्ती वाढते, पाठीचा कणा लवचिक बनतो, प्रसन्नता वाढते, सारासार विचार करण्याची व एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित करण्याची क्षमता वाढते. शारीरिक स्तरावर विविध आसने करून योग अभ्यास केला जातो. त्यामुळे मन आनंदी व उत्साही राहते. योग करणारा व्यक्ती कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सदैव तत्पर असतो. शरीर तंदुरुस्त व अनेक आजारांपासून व्यक्ती दूर राहतो .
म्हणून मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो 1999 ला प्रथमतः अस्वस्थ वाटल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो त्यांनी सर्व तपासण्या केल्या त्यात प्रथमतः रक्तातील साखरेचे प्रमाण 260 इतके निघाले वय वर्ष अवघे 29 जरा अस्वस्थ झालो पण त्याच वेळी जिद्दीने मेहनत सुरू केली त्याच काळात योग गुरु रामदेव बाबा यांच्या शिर्डी येथील शिबिरात दहा दिवसांचे प्रशिक्षण मिळाले व योग प्राणायाम सुरू केले पहिल्या तीन महिन्यात 79 पैकी 9 किलो वजन घटून रक्तातील साखरेचे प्रमाण 170 इतके झाले दुसऱ्या तीन महिन्यात 10 किलो वजन घटवून साखरेचे प्रमाण 120 इतके झाले वजन 60 किलो झाले तर साखरेचे प्रमाण 100 ते 110 असे होऊन आजपर्यंत वजन 60 – 62 किलो असे स्थिर आहे व साखरेचे प्रमाण 100 ते 110 स्थिर आहे सुरुवातीला घेतल्या जाणाऱ्या तीन गोळ्या तीन महिन्यानंतर दोन व पुन्हा तीन महिन्यानंतर एक व गेल्या 25 वर्षांपासून गोळ्या बंद आहे दररोज चार वाजता उठणे एक तास सहा किलोमीटर चालणे एक तास योगा प्राणायाम करणे यात कधीही खंड पडत नाही फारसे पथ्य पण नाही मात्र सकाळी चार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सतत व्यस्त शेडूल असते त्यामुळे जीवन खूप आनंदी आहे आपल्यात जिद्द व चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते यातून एकच गोष्ट सिद्ध होते की योगामधून शारीरिक समृद्धी होते तसेच प्रत्येकानेच आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी योगा प्राणायाम करण्याची गरज आहे या योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच संकल्प करू या योगा प्राणायामास सुरुवात करावी व स्वतःसाठी दिवसातील किमान एक तास काढावा असे आवाहन देशमुख यांनी केले .
