जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठी आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना २३-२४ कोपरगाव : येथील ओम गुरुदेव विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक रुग्णालय नव्या अत्याधुनिक सुविधांसह रुग्णांच्या सेवेत नव्याने दाखल होत असून यासोबतच आत्मा मालिक सुरक्षा योजनाही रुग्णालयामार्फत राबवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली .
याबाबत पत्रकार परिषद घेत सूर्यवंशी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की प. पु .माउलींच्या संकल्पनेतून आणि आशीर्वादाने सन २०१२ मध्ये आत्मा मालिक रुग्णालय सुरु करण्यात आले आहे . मात्र काही कारणास्तव ट्रस्टला रुग्णालय बाह्य संथाना चावण्यास द्यावे लागले होते. संबंधित संस्थानी रुग्णांना अपेक्षित सेवा पुरवली नाही. म्हणून माउलींच्या आदेशाने रुग्णालयाचे व्यवस्थापन पुन्हा एकदा व कायमस्वरूपी ट्रस्टने हाती घेतले असून यावेळी अत्याधुनिक यंत्रणेसह अधिक अनुभवी डॉक्टरांची टीम रुग्णांच्या सेवेत २४ तास हजर असणार आहे. आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना २३-२४ अंतर्गत ओपीडी आणि आय पी डी पूर्णपणे मोफत असणार असून शासनाच्या सर्व आरोग्य योजना उपलब्ध असणार असून औषधें आणि वैद्यकीय तापण्यामध्ये ५० % सूट असणार आहे. याकरिता रुग्णाकडे फक्त पिवळे किंवा रेशनकार्ड , आधार कार्ड आणि फोटो एव्हढेच कागदपत्रे आवश्यक आहेत. रुग्णालयाद्वारे अद्यावत आणि वेगवेगळ्या विभागाचे सुसज्ज असे तब्बल १० ऑपरेशन थिएटर आहेत . शिवाय २० बेड्चे सुसज्ज आय सी यु युनिट ,२० बेड्चे लहान व नवजत शिशुकरिता एन आय सी युनिट , तसेच हृदय विकार , अस्थी रोग -विकार , मेंदू विकार, किडनी , आणि डायलिसिसची अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रत्येक विभागाकरिता तज्ज्ञ डॉक्टर असणार आहे. चौकट : पत्रकार आणि भाविकांसाठी आत्मा मालिक आरोग्य योजना आश्रम ट्रस्ट रुग्णालामार्फत राबवण्यात येत आहे. यामध्ये सर्व माध्यमातील पत्रकारांसाठीच्या योजनेमध्ये पती पत्नी , दोन मुले आणि आई वडील अशा सहा व्यक्तींचा समावेश असणार आहे. या उपचारामध्ये शासकीय योजनांतील उपचारासोबत २५ हजार रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येणार असून . यापुढील लागणाऱ्या उपचार, औषधें , आणि तपासण्यावर ५० % सवलत असणार आहे. याच पद्धतीने भाविकांनाही हि योजना लागू असणार आहे.