नगर – शिवसेनेच्यावतीने नगरमध्ये ताबे बहाद्दरा विरुद्ध काढण्यात येणार्या मोर्चाला भिंगार कॉग्रेसच्यावतीने जाहिर पाठिंबा देत असल्याचे पत्र भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांना दिले.
याप्रसंगी सागर चाबुकस्वार म्हणाले, शिवसेनेच्यावतीने नगर शहरात सुरु असलेल्या जागा ताबा,अनेक अवैध धंदे, खून, दरोडे, मारामार्या, जातिय तेढ निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. ताबा बहादरांची दिवसेंदिवस मुजोरी वाढत आहे, या विरुद्ध सर्वांनी एकत्रित येत या विरुद्ध आवाज उठविणे गरजेचे आहे, या मोर्चास आम्ही सक्रिय पाठिंबा देत आहोत. प्रशासनानेही या ताबा बहादरांविरुद्ध तातडीने उपाय योजना कराव्यात अन्यथा परिस्थिती हातबाहेर जावू शकते, असेही चाबुकस्वार म्हणाले.