0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

नेवासा तालुक्यातील एका तरुणास राहुरी शहरातील हॉटेल ग्रीन समोरील रोडवर गावठी कट्ट्यासह राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

               राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून राहुरी शहरातील हॉटेल ग्रीन समोरील रोड नितीन भाऊसाहेब आल्हाट वय 33 वर्ष रा. मोरवाडी चिंचोरे, ता. नेवासा यास राहुरी पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचा एक स्टिल सारख्या धातुचा काळे व सिल्वर रंगाचा गावठी कट्टा त्यामध्ये एक काळे रंगाची मँगेझीन असलेला व ५०० रुपये किमतीचे एका प्लॅस्टिकचे पिशवीत पितळी रंगाचे पाच राऊंड व २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे.

       आरोपी नितीन आल्हाट हा गावठी कट्टा व राऊंड विनापरवाना बेकायादा विक्री करण्याचे उद्देशाने स्वतहाचे कब्जात बाळगताना मिळुन आल्याने राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here