के.जे.सोमैया महाविद्यालय रसायनशास्त्रच्या चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड

0

कोपरगाव दि .18
मुंबई स्थित क्लीनकेम लॅब (एल एल पी) या कंपनी द्वारा  स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित कॅम्पस इंटरव्यू मध्ये रसायनशास्त्र विभागातील अभिषेक यादव, ताहिर शेख, मंगेश शिंदे व महेश गवळी या चार विद्यार्थ्यांची  निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ .बी. एस. यादव यांनी येथे दिली.
      डॉ .यादव पुढे म्हणाले की, “के. जे. सोमैया महाविद्यालय येथे आयोजित कॅम्पस मुलाखतीमध्ये महाविद्यालयाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यातील अकरा विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीत निवड झाली, तर अंतिम फेरीमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.” चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने  विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून नोकरीची संधी प्राप्त करून दिली.  तसेच याआधीही काही विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती देखील प्राचार्य डॉ .बी.  एस. यादव यांनी दिली.
कॅम्पस इंटरव्यू मध्ये क्लीनकेम लॅब (एल एल पी) मुंबई येथील मा . डॉ . बापू गावडे, डॉ . अनिल गावडे व मिस रूपाली पाटील हे अधिकारी उपस्थित होते.  महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व रसायन शास्त्र विभागातर्फे सातत्याने विविध कंपन्यांच्या मार्फत कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न  महाविद्यालय सातत्याने करत असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ . सतीश काळे यांनी दिली. महाविद्यालयाने आम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, तसेच ग्रामीण भागातील  मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे, अशा भावना निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. (डॉ). नवनाथ दळवी, डॉ . नामदेव ढोकळे, डॉ. शंकरय्या कोंडा, प्रा. सदाशिव नागरे आदी प्राध्यापकांचे  मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here