एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये ‘महसूल सप्ताह युवा संवाद’ आणि ‘नवीन
मतदार जनजागृती’ कार्यक्रम संपन्न…..

0

कोपरगाव- महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या
विविध योजनांची अधिकाधिक नागरिकांना माहिती होऊन, त्यांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.
या दिनानिमित्त यावर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा ‘महसूल सप्ताह युवा संवाद’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये हा युवा संवाद कार्यक्रम दि.२ ऑगस्ट रोजी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. रमेश सानप हे होते. सदर कार्यक्रमास कोपरगावचे अप्पर तहसीलदार विकास गंबरे,नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णी, कामगार तलाठी योगेश तांगडे, धारणगावचे तलाठी धनंजय पर्हाड, सहाय्यक तहसीलदार निवडणूक विभाग- अजय खंडीझोड, रवंद्याच्या तलाठी श्रीमती निर्मळ मॅडम त्याचप्रमाणे, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, नगरपरिषद कोपरगाव. यांची विशेष उपस्थिती लाभली.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधतांना संदीपकुमार भोसले यांनी नवीन मतदारांना मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रियेतील सहभाग आणि त्याच्या अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले. तर विकास गंबरे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळण्यासंदर्भात माहिती दिली.श्रीमती निर्मळ मॅडम यांनी शेतीच्या संदर्भातील पिक- पाणी, विमा, विविध उतारे यासंबंधी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. रमेश सानप यांनी मतदानाचा अधिकार, त्याचे महत्त्व, त्या संबंधातील आपले कर्तव्य याविषयी प्रबोधनपर विचार मांडले.
कार्यक्रमास विशेष उपस्थिती देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवर आणि उपस्थितांप्रति रा.से.यो. अधिकारी डॉ. बंडाराव तर्हाळ यांनी आभार व्यक्त केले .तर प्रा.सौ. एस. एस.
ठाणगे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शाखांचे उपप्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक, प्राध्यापक आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील
विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here