पूर्वी ५० – ६० वयाच्या लोकांमध्ये यूरीक ॲसिडची समस्या पाहिली जात होती, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायमाचा अभाव, पाणी कमी पिणे आणि चुकीचे खानपान यामुळे यूरीक ॲसिड वाढते व त्याचा त्रास होतो.
यूरीक ॲसिड म्हणजे काय ?

कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण करून कंपाऊंड तयार होते, जे अमीनो ॲसिडच्या रूपात शरीराला प्रोटीनमधून प्राप्त होते त्याला युरीक ॲसिड म्हणतात.
त्यामुळे यूरीक ॲसिड वेळेवर नियंत्रित न केल्यास त्यामुळे गठीया (Gout) आणि संधिवात देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही होम टिप्स आहेत, जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.
♦️ भरपूर लिक्विड आहार घ्या
यूरीक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. आहारात फळांचा रस, नारळपाणी आण ग्रीन टी सारख्या द्रवपदार्थाचे सेवन करत रहा.
♦️ सर्व रंगांच्या भाज्या
प्रत्येक रंगाची भाजी आपल्या आहाराचा एक भाग बनवा. आपल्याला हिरव्या, लाल, केशरी रंगाच्या भाज्यांमधून सर्व पोषकद्रव्ये मिळतील, जे केवळ ॲसिडवर नियंत्रण ठेवत नाहीत तर इतर समस्या देखील टाळतील.
सिट्रस फ्रूट(सायट्रिक ॲसिडयुक्त फळे)
सिट्रस फ्रूट युरीक ॲसिड क्रिस्टल्सला वितळवून यूरीक ॲसिड पातळी कमी करतात. तसे फ्रूट आहारात जरूर घ्या, परंतु मर्यादित प्रमाणात.
♦️ छोटी वेलची
पाण्यात मिसळून छोटी वेलची खाल्ल्याने यूरीक ॲसिडचे प्रमाण कमी होईल आणि कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होईल
♦️ बेकिंग सोडा
१ ग्लास पाण्यात १/२ चमचा बेकिंग सोडा मिसळून पिल्यास युरीक ॲसिड नियंत्रणात येण्यास मदत होते.
♦️ ओवा
ओवा यूरीक ॲसिडसह शरीरातील सूज कमी करते. यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी, एका दिवसात २-३ चमचे ओवा खावा.
♦️ दररोज सफरचंद खा
सफरचंद मध्ये उपस्थित ॲसिड यूरिक ॲसिडला न्यूट्रीलाईज करते.
♦️ लिंबाचा रस
लिंबू यूरीक ॲसिडला नियंत्रित करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबूचा रस पिल्याने आपला फायदा होईल. तसेच दिवसातून चार-पाच वेळा लिंबू-पाणी प्या.
♦️ चेरी
चेरी आणि डार्क चेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घटक असतात, जे यूरीक ॲसिड कमी करण्यास मदत करतात. सूज आणि कडकपणा दूर ठेवते.
योग देखील फायदेशीर
दररोज व्यायाम करा आणि निरोगी राहा. वजन नियंत्रित ठेवा. असे म्हणतात की फॅटी टिश्यूमुळे यूरीक ॲसिड उत्पादन देखील वाढते.
❌ या गोष्टी टाळा
मद्य आणि मांसाहार मध्ये यीस्ट मोठ्या प्रमाणात असते म्हणून ते टाळावे. दही, राजमा, चणे, अरबी, तांदूळ, मैदा, लोणचे, कोरडे फळे, मसूर, पालक, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅक फूड, मांस, मासे, पेस्ट्री, केक्स, पॅनकेक्स, मलई बिस्किटे, तळलेल्या अन्नापासून दूर रहा.
❌ रात्री या गोष्टी खाऊ नयेत
प्रोटीनयुक्त आहार युरीक ॲसिड नियंत्रणात येईपर्यंत कमी खा, शक्यतो टाळा. झोपेच्या वेळी दूध किंवा डाळ घेऊ नका. तरी तुम्हाल डाळ घेण्याची इच्छा असल्यास साल असलेली डाळ तीही थोडी खावा. तसेच, जेवण करताना पाणी पिऊ नका. अन्न खाण्यापूर्वी आर्धा-पाऊण तास आणि नंतर तास-दिड तासाने पाणी प्यावे.