कोपरगांव
कोपरगांव तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सहवीचार सभा तालुका क्रीडा संकुल येथे दिनांक १८ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघ अध्यक्ष अरुण चंद्रे सर म्हणाले की जिल्हा क्रीडा कार्यालय कडून शासकीय क्रीडा स्पर्धेसाठी अग्रीम निधी मिळावा, कारण स्पर्धा घेतलेल्या शाळा, महाविद्यालय यांच्या क्रीडा शिक्षकांना संस्थेचे अनेक नियम बंधन असल्याने निधी विलंबामुळे खुप त्रास होतो. परिणामी चांगल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी न्याय मिळत नाही.. तसेच क्रीडा शिक्षकांवर जर अन्याय झाला तर संघटना भक्कमपणे पाठीशी राहील.. यावेळी गट शिक्षणअधीकारी शबाना शेख मॅडम म्हणाल्या की स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरनात पार पाडाव्या त. जास्तीतजास्त शाळा, महाविद्यालय यांनी खेळाडूंचा सहभाग वाढवायला हवा कारण हल्ली मोबाईलमुळे विद्यार्थी खेळणे विसरत चाललेत.. यावेळी जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके, विठ्ठल होन, राजेंद्र पाटणकर यांनी क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम म्हणाले की दिनांक २९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतांना खेळावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्याचा आमचा विचार आहे त्याला उपस्थित सर्वांनी हात वर करून भरभरून प्रतिसाद दिला.. सूत्रसंचालन जिल्हा संपर्क प्रमुख शिवप्रसाद घोडके यांनी केले तर आभार सचिव अनुप गिरमे यांनी मानले.. 🙏🙏