बातमी थांबवावी यासाठी पत्रकारांना अमिष ?

0

*वाई महसूल ची कमाल*?वाळू वाले झाले मालामाल*?

*शासनाची तिजोरी कंगाल?*

*भाग2*

वाईच्या भाईचे गुन्हेगारी मायाजाल*

*राजकारणाच्या जोरावर बेताल* *बातमी करणाऱ्या पत्रकारांना अडवून दमदाटी करण्याचा प्रयत्न*

*प्रशासनाकडून बातमीची दखल* *वाळू काढण्याची नवी शक्कल* 

वाई प्रतिनिधी : गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपसा या साठी जलसिंचन व महसूल नेमका अट्टाहास कुणासाठी करीत आहे? सोबतच निविदा करारनामा याखाली सुरू असलेला भोंगळ कारभार निविदेत नमूद नसलेले वाहन याद्वारे वाहतूक  जीपीएस बाबत प्रश्नचिन्ह वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही अशा अनेक त्रुटींची बातमी पुराव्यानिशी   प्रेसअलर्ट ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर जिल्ह्याच्या बड्या अधिकाऱ्यांनी कान उघडणी केल्यानंतर वाई महसूल प्रशासनाला जाग आली होती. आणि संबंधित वाळू ठेका बंद केला आहे असे नाममात्र दर्शविण्यात आले होते वाळू ठेका बंद असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली होती परंतु कंत्राटदाराने अजब गजब शक्कल लढवीत वाळूच्या ठेक्यापासून पुढे  100 मीटर अंतरावरील नदीपात्र व आसपास असणाऱ्या झाडांचाआधार घेत पुन्हा वाळू उपसा सुरू  केला असल्याची बाब समोर आली. याबाबतचे छायाचित्रण करताना तेथे असलेल्या दोन अज्ञातांनी फोनवरून भैय्याला असे सांगून पत्रकारांना बोलण्यास सांगितले. त्यावर भैय्याने तिकडून जाऊ नका थांबा मी येतोय असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर तेथे असलेल्या इतर लोकांकडून फोनवरून साथीदारांना येण्याचे सांगून इशारे बाजी सुरू झाली होती. एकसर मधील गावकऱ्यांचे वाळू डेपो संदर्भात  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असल्याची माहिती प्राप्त होती. त्यानुसार संबंधित लोकांची व्हिडिओ बाईट घेण्यासाठी पत्रकार जात असताना एक अज्ञात व्यक्ती बुलेट वरून पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु कामानिमित्त बाहेर असल्याने तेथे कोणीच उपलब्ध नव्हते त्यामुळे  परत वाईकडे निघाले असताना पुन्हा तो बुलेट स्वार आणि एक चार चाकी वाहन यामधून गाडी अडवून थांबवण्याचा प्रयत्न होऊ लागला होता. प्रसंगावधानता दाखवीत पत्रकारांनी गाडी भरधाव वेगाने नेण्यास सुरुवात केली. बुलेट स्वार आणि चार चाकी वाहन यामार्फत भरधाव वेगाने पत्रकारांच्या वाहनाचा पाठलाग सुरू झाला होता. शेवटी अमोघ रेसिडेन्सीच्या पुढे काही अंतरावर असणाऱ्या परिसरात बुलेट स्वराने गाडी आडवी लावली आणि त्यानंतर पाठीमागून आलेल्या चार चाकी वाहनातून चार जण उतरले त्यातील एकाने पत्रकारांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. सोबतच त्यामधील एक जणाने आपण भैय्या डोंगरे वाई पंचायत समिती उपसभापती असल्याचे सांगितले सोबतच दमदाटी करीत मला एका पत्रकाराने त्रास दिला होता त्याला मी खिंडीत नेऊन नागडा करून मारला होता असे म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सोबतच मला त्रास झाला तर मी कोणालाही सोडत नाही असे म्हणत मी आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांचा कार्यकर्ता आहे. माझ्या डोक्यात जाऊ नका आम्ही वीस लाख रुपये भरले आहेत. आम्ही काय गोट्या खेळायचे का? वाईसह सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही नसूनही वाळू उपसा सुरू आहे. कशाकशाने वाळू उपसा सुरू आहे. याबाबत मला सर्व काही माहित आहे पण मी दुसऱ्याच्या ताटात बघत नाही मला काय देणंघेणं नाही पण माझी बातमी करू नका आणि तुम्हाला काय हवे असल्यास मला सांगा असे अनेक प्रकार सुरू असल्याने पत्रकारांनी ही बातमी करणार नाही असे म्हणून त्याला तात्पुरता दिलासा देऊन वाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. वाई उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला  प्रकार सांगितला. त्यानंतर नितीन काका पाटील यांच्याशी संपर्क करून घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती दिली. त्यांनीही तुम्हाला कोणताही त्रास नाही होणार अशी ग्वाही दिली. त्यामुळे वाळूमुळे तयार झालेल्या वाळू माफियांवर प्रशासन कारवाई करणार का? वाईच्या तहसीलदार यांच्याकडून नुसत्याच  आश्वासनांची बोळवण होणार, गावगुंडांकडून पत्रकारांवर हल्ला होण्याची वाट प्रशासन बघणार की तात्काळ कारवाईचा बडगा उगारण्यात येणार!

क्रमश:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here