आर जे एस नर्सिंग व होमिओपॅथीमक कॉलेज मध्ये जागतिक हृदय दिवस साजरा

0

कोपरगाव प्रतिनिधी

_________________

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग व होमिओपॅथीक कॉलेज १९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला.हा दिवस १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग व होमिओपॅथीक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता साईबाबा चौफुली ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालया पर्यंत आरोग्य कशा पद्धतीने सांभाळावे व निरोगी राहण्यासाठी काय करावे. काय करू नये हा संदेश देत रॅली काढली होती. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे विद्यार्थ्यांनी हार्ड अटॅक का येतो.न येण्यासाठी काय उपाय करावे हे समजून सांगण्यासाठी एक छोटीशी नाटिका सादर केली होती. यासाठी ग्लेनमार्क फार्माब्युटीक कंपनीने आपल्या प्रायोजकत्व केले होते. तसेच कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी साईबाबा चौफुली येथे विद्यार्थ्यांनी काढलेल्या जनजागृती रॅलीला भेट दिली.

 कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कुष्णा फुलसुंदर यांनी विद्यार्थ्यांना व रुग्णांना हृदयविकार काय आहे.का होतो यावर काय उपाय करावेत हे त्यांनी समजावून सांगितले. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर संजय उंबरकर यांचा सत्कार राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांनी केला.या विषयी अधिक माहिती होमियोपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सावनी यरनाळकर यांनी विद्यार्थ्यांना व रुग्णांना समजावून सांगितली.सूत्रसंचालन रेश्मा शेख तर आभार प्रदर्शन होमियोपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सावनी यरनाळकर यांनी केले.यावेळी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. इरशाद अली, ग्लेनमार्क फार्मा ब्युटी कंपनीचे राम शेजवळ व इतर सहकारी तसेच होमियोपॅथीक  व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here