संजीवनी अकॅडमी व इंटरनॅशनल स्कूलची राष्ट्रीय  स्पर्धेत बाजी

0

 दोनही स्कूलने अनुक्रमे प्रथम व द्वीतिय क्रमांक मिळवुन जिंकले रू  ७५ हजाराचे बक्षिस
कोपरगांव: आयआयटी, गांधीनगर (गुजरात) आयोजीत ‘रिमोट कंट्रोल्ड (आरसी) कार रेसिंग कोडींग’ या राष्ट्रीय  स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित कोपगावच्या संजीवनी अकॅडमीच्या Sanjeevani Academ बाल तंत्रज्ञांनी प्रथम तर शिर्डी  येथिल Sanjeevani Academy and International School संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या बाल तंत्रज्ञांनी द्वीतिय क्रमांकाचे बक्षिस जिंकुन दोन्ही टीम मिळुन एकत्रित रू ७५ हजाराचे रोख बक्षिस, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह मिळविले. संजीवनीच्या दोनही टीमने राष्ट्रीय पातळीवर national competition मुसंडी मारत संजीवनीचे बाल तंत्रज्ञ तंत्रज्ञान क्षेत्रात देशात  आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, अशी माहिती संजीवनीच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

संजीवनी अकॅडमीच्या स्पंदन प्रकाश जाधव, अथर्व देवेश  बजाज व जय तरूण भुसारी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या श्रेय रूपेश  महिंद्रकर, रायन अब्राहम टाॅनी व वीरा राहुल विखे यांनी मार्गदर्शक  प्रा. आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  आरसी रेसिंग कार बनवुन तिचे सादरीकरण केले व अनुक्रमे प्रथम व दुसरा क्रमांक मिळविला. हे सर्व विध्यार्थी सध्या इ.९9 वी मध्ये शिकत आहेत. आरसी कारच्या डिझाईन आणि विकासामुळे सहभागी विध्यार्थ्यांना  साहित्य निवड, फॅब्रिकेशन प्रक्रिया,  आणि विविध घटकांचे पूर्ण कार्यक्षम प्रणालीमध्ये एकात्मतेचे अमुल्य व्यावहरीक ज्ञान मिळाले. या प्रत्यक्ष अनुभवातुन विद्यार्थ्यांनी  अभियांत्रिकी तत्वांची सखोल माहिती मिळविली आणि त्यांच्या भविष्यातील  करिअरसाठी आवश्यक  कौशल्ये आत्मसात केली.

 या स्पर्धेमध्ये देशभरातील पाॅलीटेक्निक्स, इंजिनिअरींग काॅलेजेस मधिल विद्यार्थ्यांनीही  सहभाग नोंदविला. परंतु संजीवनी मध्ये शालेय  स्तरावरच अभियांत्रिकीचेही धडे व ज्ञान मिळत असल्याने संजीवनीच्याच विद्यार्थ्यांनी  विजयश्री खेचुन आनली.
               विध्यार्थ्यांच्या  या राष्ट्रीय  यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे  अभिनंदन करून त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ  स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे, प्राचार्या शैला  झुंजारराव, प्रा. गायकवाड व पालक रूपेश  महिंद्रकर, तरूण भुसारी, अमृता जाधव, मेघा बजाज व शीतल  महिंद्रकर उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी दोनही टीमचे अभिनंदन करून पालकांच्या मिळणाऱ्या  सहकार्याबध्दल धन्यवाद व्यक्त केले.

    फोटो ओळीः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष यांनी संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी  आरसी कार रेसिंग कोडींग या राष्ट्रीय  स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबध्दल छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. सत्कारनंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी डाॅ. मनाली कोल्हे, प्राचार्या व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here