आज विरगाव मध्ये शुभारंभ ,पहिल्या टप्पात 108 गावात आयोजन
अकोले प्रतिनिधी –
केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा या साठी विकसित भारत संकल्प यात्रेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे पहिल्या टप्प्यात अकोले तालुक्यातील 108 गावांची निवड करण्यात आली आहे.या संकल्प यात्रेचे नियोजन आज 1 डिसेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात आलेले आहे.
या यात्रेचा शुभारंभ आज 1 डिसेंबर रोजी विरगाव पासून सुरु होत आहे. या यात्रेची जबाबदारी ग्रामपंचायत वर दिली असून त्यासाठी संपर्क प्रमुख नेमण्यात आलेले आहेत. या संकल्प यात्रेच्या वेळी विविध योजनाचे स्टॉल लावण्याच्या, नागरिकांना माहिती देण्याच्या व नागरिकांचे जागेवर फॉर भरून घेण्याच्या सूचना नोडल ऑफिसर तथा गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी परिपत्रक काढून दिलेल्या आहेत. या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती ग्रामपंचायत स्तरावरील 1 ते 9 बाबींची पूर्तता करावयाची आहे. काही गावासाठी सकाळी 8 ते 1 अशी वेळ देण्यात आली आहे तर काही गावांना दुपारी 2 ते 6 अशी वेळ देण्यात आली आहे. ही विकसित भारत संकल्प यात्रा प्रत्येक गावात वेगवेगळ्या तारखेना जाणार असून या संकल्प यात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले आहे.
या योजनांची मिळणार माहिती
आयुष्य हेल्थ कार्ड, उज्वला योजना,पी.एम.स्वनिधी, आधार कार्ड आदिसह विविध योजनांचा या यात्रेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. या महत्वाकांशी योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी योजनाबाबतची जन जागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा उपयुक्त ठरणार असल्याचे भाजपा,पंचायतराज व ग्रामविकास महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच विकसित भारत संकल्प यात्रा उत्तर नगर संयोजक रोहिदास धुमाळ यांनी माहिती दिली.
-यात्रेची उद्दिष्टे –अकोले तालुक्यातील विविध योजनासाठी पात्र असलेल्या मात्र लाभापासून वंचित असलेल्या घटकापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणे, शासकीय योजनाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे ही या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रे दरम्यान विविध योजनाचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात. रावसाहेब वाकचौरे,