डंपरच्या धडकेने सायकल स्वार ठार: आरोपीची निर्दोष मुक्तता

0

 अहमदनगर:- डंपरच्या धडकेने सायकल स्वाराच्या झालेल्या मृत्युप्रकरणी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

याबाबत अधिक माहिती अशी की दि.08/01/2020 रोजी सकाळी 8.45 वाजता अहमदनगर शहरातील तपोवन रोडने पिंपळगांव माळवी रोडवर ढवण यांचे विट भट्टीजवळ, सावेडी गावचे शिवारात आरोपी समीर हयातखान पठाण, रा.अमिरमळा, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर याने स्वत:चे मालकीचा डंपर क्र.एचएच-16-एई-2999 हे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना स्वत: चालवित घेऊन जात असतांना तो अविचाराने हयगयीने रस्त्याचे व रहदारीचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन डंपर भरधाव वेगात चालवून समोरुन येणारा सायकल स्वार नामे मन्सूर शेख, वय 60 वर्षे यास जोराची धडक देऊन सायकल स्वारास गंभीर जखमी करुन त्याचे मृत्यूस कारणीभुत झाला. तसेच या अपघाताची खबर न देता निघून गेला. म्हणून तोफखाना पोलिस स्टेशन, अहमदनगर यांनी वरील आरोपीच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम 304 (अ), 279, 338, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) 177, 3(1) 181 अन्वये गुन्हा दाखल केला होता . त्याची चौकशी अहमदनगर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, यांचे समोर होऊन त्यात आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अ‍ॅड.सतिषचंद्र वि. सुद्रिक यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here