कामचुकार कर्मचार्‍यांसाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे अॅक्शन मोडवर

0

कर्तव्यात कसूर करणारा कनिष्ठ सहायक गोरख नरवणे निलंबीत !                                      

जामखेड तालुका प्रतिनिधी :-  गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्यात हजर झाल्यापासूनच शिक्षकांना चांगली शिस्त लावली तर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. त्यामुळे जामखेड तालुक्यात कधी नव्हे ते एवढे चांगले शैक्षणिक वातावरण प्रथमच तयार झाले असून वेगवेगळे उपक्रम राबवून चांगली शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे .              

      परंतु हे करत असताना गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ सहायक  गोरख नरवणे हे वारंवार कार्यालयात गैरहजर राहिल्याने शिक्षकांची व प्रशासकीय कामे होत नव्हती . त्यांना अनेक वेळा सुचना व नोटीस दिल्या परंतु त्यांच्या वर्तनात व कामकाजात कोणताही बदल झाला नाही , त्यामुळे धनवे यांनी त्यांचा निलंबनाचा प्रास्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना पाठविला होता.                    

      याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गोरख नरवणे  कनिष्ठ सहायक यांना सेवानिलंबीत केले आहे .व निलंबन काळात मुख्यालय पंचायत समिती अकोले देण्यात आले आहे. धनवे हे अॅक्शन मोडवर आल्यामुळे कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here