नाशिक : कोविड नंतर वाढलेल्या इंटरनेट वापरामुळे उद्भवणारा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला ज्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये cyber crime गुंतलेल्या मुलांच्या चिंताजनक संख्येच्या बाबतीतही वाढ झालेली आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अतिथी आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यांनी केले..
आगामी वार्षिक सायबर सायकॉलॉजी परिषद 2024 च्या निमित्ताने, रिस्पॉन्सिबल नेटिझम या सायबर जगतात महिला व बालकांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेने नाशिक, येथे नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व म .वि .प्र. संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
‘ शिक्षणातील सायबर वेलनेसची उत्क्रांती’ हा या चर्चेचा विषय होता. ह्या परिषदेसाठी नाशिक जिल्हयांतुन जवळपास ५५० हुन अधिक मुख्याध्यापक, शिक्षक आणि मुलांसोबत काम करणारे मानसिक आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक उपस्थित होते. नाशिक जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नाशिक यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
रिस्पॉन्सिबल नेटिझमचे प्रमुख उन्मेष जोशी ह्यांनी वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांची ओळख करून देताना आपण दैनंदिन आयुष्यात इंटरनेटवर किती अवलंबून आहोत आणि त्यामुळेच एखाद्या बेसावध क्षणी सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात कसे अडकतो हे सांगताना अशा सायबर गुन्हे किंवा घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी काय तांत्रिक सावधगिरी बाळगता येईल यावर मार्गदर्शन केले
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने. एस.बी. देशमुख (सचिव) यांनी शिक्षणात सायबर वेलनेस या विषयाचा आंतर्भाव गरजेचा असुन विद्यार्थी, पालक व संस्थाचालक यांना या बाबत प्रबोधन करणे आवश्यक असुन ही भुमिका मख्याध्यापकांनी या प्रशिक्षण नंतर पार पाडावी . प्रदीप सांगळे (उपाध्यक्ष) डॉ. अनिल माळी, बी . डी .गांगुर्डे, दिपक व्याळीज , गायकवाड सर सुनिल आहेर यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आपले विचार मांडले .
नाशिक मधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनुप भारती यांनी सायबर विश्वातील आपले एकूणच मानसिक आरोग्य किती धोक्यात आले आहे त्यातून उदभवणाऱ्या विविध मानसिक समस्यांवर प्रकाश टाकला. नेटीझमी संस्थेच्या समुपदेशन विभागाचे मानसतज्ञ स्वप्नील पांगे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सायबर विश्वातील वाढत्या हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या हाताळण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणसंस्था ह्यांनी काय प्रथमोपचार करायला हवेत ह्याबद्दल मार्गदर्शन केले. समारोपाच्या वेळी एस .बी . देशमुख व प्रदिप सांगळे ह्यांनी नाशिक मधील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित ठेवण्यासाठी नजीकच्या काळात संस्थेतर्फे काय योजना राबविता येतील ह्याबद्दल माहिती दिली. त्यात प्रामुख्याने पुढील कार्यक्रमांचा अंतर्भाव असेल हे जाहीर केले
१. नाशिक मधील शाळांमध्ये सायबर वेलनेस धोरण राबवण्यासाठी मुख्याध्यापकांसाठी ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात येईल
२. सायबर विश्वातील गुन्ह्यांमध्ये अडकणाऱ्या तसेच पिडीत मुलांना हाताळताना त्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात येईल .
३. शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकतेचे प्रशिक्षण मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येईल .