कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने दिलेल्या जनसेवेच्या संधीतून विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा कायापालट करतांना मागील चार वर्षात सर्व समाजाला समान न्याय देवून समाजाभिमुख विकास करतांना एकही समाज मागे ठेवला नाही असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव येथे आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मंजूर १० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या ‘सासवड माळीसभा बोर्डिंगच्या’ नूतनीकरण कामाचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, मला जनसेवेची संधी देण्यात मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या समाज बांधवांचा सहभाग आहे. त्यामुळे विकासाभीमुख दृष्टीकोनातून कोपरगावचा चेहरा मोहरा बदलवत असतांना मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी प्रश्न आदी कामांबरोबरच विविध समाजाकरीता निधी देऊन कुठलाही समाज विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही याची आजवर दक्षता घेत आलो असून यापुढे देखील घेत राहणार आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील माळी बोर्डींग साठी भरीव मदत केलेली होती. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा वारसा पुढे चालवतांना मी देखील प्रत्येक समाजाला विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करून प्रत्येक समाजाच्या विकासासाठी कायमस्वरूपी कार्यरत राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले
यावेळी रामभाऊ बनकर, पद्माकांत कुदळे, रविकाका बोरावके, कैलासराव माळी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, अनिल पांढरे, अनिल शेवते, हेमंत बोरावके, तुषार ससाणे, प्रभाकर पाटील, महेंद्र नवले, राजाभाऊ गिरमे, श्री पठाडे, रविंद्र नेवगे, रवि चौधरी, सतिश भुजबळ, शेखर बोरावके, विपुल गिरमे, राहुल बेनकर, विजय ओढणे, गिरीश हिवाळे, अनुप गिरमे, संदिप जगझाप, अक्षय वैद्य, शेखर भोंगळे, तुषार ससाणे, रत्नाकर पिंगळे, सुभाष भास्कर, शैलेश गाडेकर, गौतम टिळेकर, राजेंद्र बोरावके, अमोल गिरमे, आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, शहराध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, गणेश बोरुडे, सचिन गवारे, शुभम लासुरे, हर्षल जैस्वाल, रोहन कांबळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.