माल्या निरव मेहूल
बॅंका लुटून पळाले
विनोद झाला मोठा
कुणां नाही कळाले….
वेडपट प्रश्न कशास
कोण होते मिळाले
बडे मासे ते सुटले
छोटे लागले गळाले…
काळा पांढरा पैसा
समीकरण जुळाले
सहकार जिंदा रहे
एकीकरण फळाले….
सामान्यांचे त्राण ते
क्षण भरात गळाले
विसरून जा विषय
दुसरी कडे वळाले …
पुरावे खोल पुरावे
कागदपत्रे जळाले
चाळीस टक्के पैसे
म्हणे परत मिळाले…
कायम एप्रिल फूल
कारणनको निराळे
आमच्याराशीला रे
कायमचेचं उन्हाळे….
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.