अश्वमेधचे आयुर्वेदिक औषधी गोळ्यांचे उत्पादन सुरु : डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे 

0

कोपरगाव -प्रतिनिधी :

आयुर्वेद अनेक रोगांना मुळापासून बरा करतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे . परंतु त्यात काही औषधे कडू स्वादाची असतात त्यामुळे ग्राहक नाखूष असतात. त्या समस्यावर येथील औषध क्षेत्रात नाव कमावलेल्या अश्वमेध प्रकल्पात स्वादिष्ट चवीला गोड व कमी दरात औषधी गोळ्यांचे उत्पादन सुरू झाले आहे अशी माहिती अश्वमेधचे संचालक, कीड रोग तज्ञ ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिली.                                 

ते म्हणाले, लोकहित उपयोगी असलेल्या अश्वमेध प्रकल्पात मागील काही वर्षातील अनुभव व विशेष प्रयत्नातून खास करून कोरोना काळात सर्दी खोकला व घश्यातील खवखवी साठी कफेक्स, प्रोटेक्स, ऍसिडिटी साठी रिफलेक्स, पोट साफ होण्यासाठी रेक्टीमॅक,जेवणानंतर मुखवासासाठी संजीवनीपान , मँगो पॉप अशी बहुगुणी परिणामकारक आयुर्वेदिक औषधी सर्वसामान्य नागरिकांपासून तर श्रीमंतापर्यंत बाजार पेठेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत . तोच गाढा अनुभव पाठीशी घेऊन औषधी गोळ्या निर्मिती करण्यात आल्या आहेत.

कफेक्स गोळी हि सर्दी खोकल्यास विशेष गुणकारी ठरली असल्याचा त्यांचा दावा आहे . तसेच एक ते 2 मिनिटात ऍसिडिटी घालवणारी बाजारातील रिफलेक्स हि पहिली बाजारातील औषधी गोळी ठरेल असा विश्वास वाघचौरे यांनी व्यक्त केला आहे. 

कब्ज, अपचन त्यामुळे डोकें दुखी व शौचास त्रास होणे या आजारावर व मुळव्याधीस कारणीभूत ठरणाऱ्या वेदनांवर केवळ 2 ते 3 दिवसात आणि केवळ फक्त 20 रुपयाच्या आत उपचार होण्यासाठी रेक्टीमॅक औषध उपयोगी ठरेल .  या बहुगुणी गोळीची प्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने निर्मिती केली आहे . देशी बनावटीची हि गोळी ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. सदर ची उत्पादने लवकरच रशिया व युरोप देशात देखील प्रसारित होणार आहेत.

अश्वमेध कंपनी ने कोविड 19 मध्ये लाखो रूग्णांना दिलासा देणारे कफेक्स व प्रोटेक हि अयिर्वेदिक सिरप या पूर्वी ग्राहकांना देऊन दिलासा देणारा  ठरला होता.  तर पशु पक्षी प्राणी यांच्या साठी देखील बहुगुणी औषधी प्रकल्पात निर्मित होत आहेत . 

अश्वमेध च्या मागील 20 वर्षाच्या अनुभवातून संशोधनांचा सर्वसामान्य जनतेस स्वस्तात व शास्वत दरात फायदा व्हावा व हि उत्पादने सर्वसामान्यांच्या घरोघरी पोहचावी या उद्देशाने  शास्त्रज्ञ डॉ ज्ञानेश्वर वाघचौरे व  टीम चाअहोरात्र प्रयत्न आहे.  त्यास मार्केटमध्ये यश आले आहे.  रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्दीतून श्वास महा रोग निमोनिया , दमा , पित्त विकारातून हृदयरोग ,पोटाचे अल्सर , मूळव्याध , मधुमेह , किडनी विकार आदी महारोग वाढत आहेत ते कमी करण्यासाठी सदरची उत्पादने परिपूर्णपणे काम करतील असा विश्वास व दावा डॉ वाघचौरे यांना आहे.

सदर प्रकल्पाच्या उभारणीत डॉ ज्ञानेश्वर दरंदले  औषध निरीक्षक , अन्न  व औषध प्रशासन  जिल्हा अहमदनगर  यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य झाले आहे. तसेच वैद्य डॉ अशोक गावित्रे आणि वैद्या सायली वाघचौरे यांनी उत्पादने विकासासाठी शास्त्रीय आधार देत त्यांना प्रमाणबद्ध केले आहे.  उत्पादन प्रकल्प अधिकारी चांगदेव गव्हाणे तर प्रॉडक्ट डिझायनिंग साठी समर्थ वाघचौरे व विक्री आणि विपणनाची जयंत शर्मा यांनी योगदान दिले असल्याचे संचालक वाघचौरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here