डाॅक्टर आंबेडकरजी
व्यक्तीत्व बहुआयाम
जनकल्याण कार्यात
कधी ना पडे विश्राम…
मानव न्यायाकरिता
तोअभूतपूर्व संग्राम
रूढी श्रुढ परंपरांना
जातीभेदांना लगाम…
ज्ञानार्जन सातत्याने
शिकण्या ना आराम
कैक पदवी विभूषित
साधक गौरव इनाम…
घर समृद्ध ग्रंथालय
पुस्तकांचे जणूं धाम
संविधानाचा निर्माता
मोतीस्वरूप हो घाम…
सुखी केले कामगार
तुजला निळा सलाम
कष्टक-यास रोजगार
लक्षहाता मिळे काम…
पुरुष प्रधान संस्कृती
महिला होत्या गुलाम
नारी सन्मान कार्यात
सुखवी वनिता तमाम…
रिझर्व्ह बँक स्थापना
अर्थ दिशा आप्तकाम
शेती व्यवसाय व्हावा
अर्थकारणा अंतर्याम…
— हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996