महा मानव लाडके
खरोखरी बोधीसत्व
तंतोतंत आचरणात
बुध्दधर्मांची ती तत्व…
आजकळे विचारांत
भरलेले जीवनसत्व
आपल्यात नसतानां
जाणते अपार महत्व…
चरित्र गाथा सांगता
दगडापाझरे कवित्व
सक्षम संविधानाला
लाभले तव पितृत्व…
हृदयी थेट पोचायचे
अभ्यासपूर्ण वक्तृत्व
संग्रहात राहो भाषणे
अजूनि अपूर्व महत्त्व …
इतिहास गाई गोडवे
विरळा हे व्यक्तीमत्व
जाती पाती पलीकडे
निळ्यासूर्याचे कर्तृत्व…
हक्क कर्तव्य सांगड
कळले घेण्या दायित्व
आंदोलन असे करा
शिकवी सार्थ नेतृत्व…
भरभरून देई सकला
असे ना कुठे दातृत्व
मना मनात ठसलेले
जाणे अजून अस्तित्व…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.