अति पिडे दुष्काळी
कडबा नाही वावरी
मत देतात शेतकरी
अवघ्यादेशा सावरी..
मतदान रांगेत दिसे
कामगार न् कष्टकरी
बुडू द्या हो रोजंदारी
आनंदे मतदान करी…
कामवाली सदाव्यग्र
कार्यव्यस्त घरोघरी
बोटास लागली शाई
मत दिले राम प्रहरी….
होटिंग ड्युटी करता
शिक्षक त्रस्तावे जरी
भले पोस्टल पध्दती
मतदान नक्की तरी….
आम्ही मात्र मदमस्त
सुट्टी ही एन्जॉय करी
एकामताने न बिघडे
निर्लज्जता ठसे उरी…
घसरले मताचे टक्के
बोंबा मारी कितीतरी
बोटाला ना लगे शाई
रूखरूख नसे अंतरी…..
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
www.kavyakusum.com