शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोपरगांव(प्रतिनिधी) : ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून नग्न अवस्थेत फोटो काढून ते मोबाईल वर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीच्या पार्लर मध्ये २०२२ मध्ये येऊन शारीरिक संबंध ठेवले त्याच बरोबर वेळोवेळी आरोपी याने फिर्यादीसोबत मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन व जीवे मारण्याची धमकी देत अन्याय अत्याचार केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील अर्जुन देवकर (रा.टाकळी, कोपरगांव) याच्या विरुद्ध ३७६(२)(N), ५०६ प्रमाणे दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २२/२०२२ रोजी फिर्यादी हिच्या पार्लर व्यवसयासाठी आरोपी याने रुपये ५ लाख रुपये उसनवारी दिले असता आरोपी याने पार्लरमध्ये छुपे कॅमेरे बसून फिर्यादी हीचे नग्न अवस्थेत फोटो काढून सदर फोटो हे व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले असून फिर्यादी हिच्या २०२२ रोजी पार्लर मध्ये ,त्याच बरोबरी आरोपी याच्या धारणगाव रोड येथील ऑफिस वर आणि नाशिक येथील एका लॉज वर बळजबरीने फिर्यादी हिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेऊन धमकावले असता फिर्यादी हीने आरोपी याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्या प्रमाणे आरोपी याच्या विरुद्ध भा.द.वी कलम ३७६(२)(N),५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून मा. विशेष तथा अति. जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांचे समक्ष आज रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी हजर केले असता मा.न्यायालयाने अटक आरोपी यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस सपोनि विश्वास पावरा हे करत आहे.