सिन्नर : टाकेद बु . आश्रमशाळा संस्थाचालकाची मुख्याध्यापकास बेबंदशाही अपर आयुक्त संदीप गोलाईत आदिवासी विकास विभाग नाशिक यांना निवेदन दिले . येथील अनुदानित आश्रमशाळा टाकेद बु .येथील मुख्याध्यापकाने मुख्याध्यापक संघाकडे दाद मागितली असून यावर काही कारवाई न केल्यास मुख्याध्यापक संघ तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
टाकेद बु . येथील संस्थेने सदर मुख्याध्यापक यांना क्षुल्लक कारणे देऊन, कोणतेही गंभीर आरोप नसतांना, संस्थेच्या आपापसांतील मतभेद आणि वाद असल्याने, संशयावरून कारवाई करण्यात आली. प्रत्यक्षात संस्थेच्या अंतर्गत वादाचे निमित्त आणि त्याबाबत प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मिळून संस्थेच्या सेक्रेटरीना चुकीची माहिती पुरवून कारवाई करण्यास ,कारणे वेगळी आहेत परंतु संस्थेने कोणत्याही बाबींची खातरजमा न करता केवळ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुरविलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे मुख्याध्यापक आर डी पठाडे यांच्यावर गंभीर कारवाई करत त्यांना पदावनत केले आहे.
संस्था मागील दोन वर्षापासून वारंवार सदर मुख्याध्यापक यांच्यावर अन्याय व अत्याचार करत होती. वेळोवेळी संस्थेने शिक्षक ,कर्मचारी यांना हाताशी धरून खोटे आरोप करून मेमो दिलेले होते . सदर मेमोंची समर्पक खुलासे करूनही संस्थेने वेळोवेळी शिक्षक कर्मचारी यांना हाताशी धरून मुख्याध्यापक यांच्यावर खोटेनाटे आरोप करून मेमो दिलेले आहेत . सदर मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी खुलासा केलेला असूनही संस्थेने चौकशी समिती स्थापन करून शुल्लक आरोप दोषारोप ठेवून त्यांना मुख्याध्यापक पदावरून पदावनत करत खालच्या पदावर आणले. तसेच सेवाजेष्ठतेने कनिष्ठ असलेल्या शिक्षकाला आपला मर्जीतील माणूस म्हणून जंपिंग प्रमोशन देऊन मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिलेली आहे . तीही चुकीची आहे. सदर सर्व बाब ही या मुख्याध्यापकावर अन्यायकारक आहे आणि म्हणून सर्व बाबींचा नियमांचा विचार करता अशा प्रकारे बारा वर्षे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकाला आपल्या पदावरून पदावनत करून खालच्या पदावर आणून त्याचे आर्थिक नुकसान करणे, मानसिक खच्चीकरण करणे आणि त्याचे आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, आज सर्वत्रच खाजगी संस्था चालविणारे संस्थाचालक मनमानी करून कुणालाही पदोन्नती देतात किंवा पदावनत करत खालच्या पदावर आणले जाते, नोकरीतून बडतर्फ केले जाते, खोटे आरोप ठेवून चौकशी समिती नेमुन त्याला दोषी ठरवून सेवेतून काढून टाकणे असे सर्रास प्रकार काही आश्रम शाळांमध्ये दिसत आहे, यावर शासनाचाही अंकुश नाही आणि आदिवासी विकास विभागाचाही अंकुश दिसून येत नाही,असे आरोप मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख यांनी केले आहेत. आश्रमशाळा मुख्याध्यापक, विभागातील मुख्याध्यापक, सहकारी याच्यावर संस्थेमार्फत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून बनावट व खोटे आरोप लिहून घेऊन बेकायदेशीर कारवाई संस्थेने केलेली आहे, अशा सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या खोट्यानाट्या आरोपांवर चौकशी समिती नेमण्यात येऊन त्या मुख्याध्यापकाची चौकशी करण्यात आली. सदर समितीचा निर्णय सकारात्मक असून ,संस्थेने बेकायदेशीर मार्गाने ज्युनियर व्यक्तीला मुख्याध्यापक पद देण्याकरिता आणि हट्ट पूर्ण करण्याकरिता चौकशी समितीच्या निर्णयालाही न जुमानता आपल्या सहकाऱ्याला पदावनत करून त्याला शिक्षक पदावर आणून कनिष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक करत आहे ही शोकांतिका आहे. आज आपण वेळीच जागृत होऊन एक नाही झालो तर अशी वेळ भविष्यात आपल्या पैकी कोणावरही येऊ शकते, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांची याअन्याया संदर्भात भेट घेतली. आज एक मुख्याध्यापक मित्र जात्यात असेल तर इतर अनेक सुपात आहेत अशी भीतीदायक भावना अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांमध्ये निर्माण झालेली आहे. याप्रमाणे जर ही कारवाई संस्थेकडून यशस्वी करण्यात आली आणि त्या मुख्याध्यापकाला पदावनत करून शिक्षक करण्यात आले तर आश्रम शाळा विभागांमध्ये चुकीचा पायंडा पडू शकेल चुकीची रीत निर्माण होईल याकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावेअसे आवाहन करण्यात आले आहे. संस्थाचालकांच्या या बेबंदशाहीला, हुकूमशाहीला वेळीच आळा घालावा असे मुख्याध्यापक संघातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे अन्यथा मुख्याध्यापक संघातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत , सचिव – एस .बी .देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे , आश्रमशाळा विभागाचे नेते विजय पाटील, डॉ . अनिल माळी , अनिल खालकर, डी .जे . रणधीर,भागीनाथ घोटेकर, मंगला सोनवणे , निर्मला पगार, मुक्ता पाटील यांनी सांगितले.