उरण विधानसभा  मतदार संघात ५५.०५ टक्के मतदान

0

मतदारात निरुत्साह ; त्यातच शेवटच्या अर्ध्या तासासाठी वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम 

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )मावळ -३३ लोकसभा मतदार संघासाठी १३ मे २०२४ रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी मतदारात निरुत्साह दिसत होता. सकाळी ७ :०० वाजता सुरू झालेल्या मतदानाच्या वेळी उरण विधानसभा – १९० मतदार संघातील उरण शहरात तुरळक तर उरण, पनवेल व खालापूर तालुक्यातील    ग्रामीण भागात काही प्रमाणात मतदार मतदानासाठी केंद्रावर पोहचले होते. पहिल्या तीन तासात अवघे ५ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी ३:०० वाजेपर्यंत २९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ :००

मतदान करण्याच्या शेवटी उरण विधानसभा -१९० मतदार संघात एकूण सरासरी ५५.०५ टक्के एवढे मतदान झाले.

मावळ -३३लोकसभा मतदार संघात एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे होते.मात्र या मतदार संघातील खरी लढत मागील १० वर्षे मावळ लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले विद्यमान खासदार श्रीरंग चंदू बारणे (शिवसेना शिंदे गट)निशाणी धनुष्यबाण आणि पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेचे माजी महापौर संजोग विकू वाघिरे पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )निशाणी मशाल यांच्यातच झाली आहे.

या सर्व उमेदवारांचे भवितव्य आत्ता मतदान यंत्रात शिलबंद झाले असून,आत्ता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यासाठी यासाठी पुढील ३ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जून २०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here