इनामदार शाळेत हेड बॉय आणि हेड गर्ल निवडणूक उत्साहात संपन्न 

0

विजयी विद्यार्थी उमेदवारांना आमदार संग्राम जगताप यांनी दिली शपथ 

अहमदनगर (प्रतिनिधी) : येस फौंडेशन संचलित गोविंदपूरा मुकुंदनगर येथील पी.ए.इनामदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हेड बॉय आणि हेड गर्लसाठी  निवडणुका घेण्यात आल्या. शाळेत या निवडणुकीत उभे राहण्यासाठी इयत्ता १० वी आणि ९ वी मधील विद्यार्थ्यांना पात्र धरण्यात आले त्यानुसार १० वी तील विद्यार्थी हेड बॉय आणि गर्ल साठी तसेच ९ वीचे विद्यार्थी असिस्टण्ट हेड बॉय आणि गर्ल साठी निवडणुकीला उभे राहिले आणि सुरु झाली शाळेतील या निवडणुकांची लगबग मागील आठवडा भरात शाळेत या निवडणुकीचे वातावरण अत्यन्त रंगतदार असे बनले होते.

अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या निवडणुकीत उभ्या असलेल्या विद्यार्थी उमेदवारांनी संपूर्ण शाळेत प्रचार केला त्यांना प्रत्येक वर्गात ५ ते ६ मिनिटे प्रचार भाषण करण्यास लावण्यात आले आणि विद्यार्थ्यांनीही जोमात प्रचार केला, पॅम्प्लेट्स वाटले आणि भिंतींवर बॅनर लावले आणि मतदानाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी डिजिटली वोटिंग मशीनवर मते दिली आणि नंतर मतमोजणी झाली आणि विजयी उमेदवार घोषित करण्यात आले यात शाळेच्या हेडगर्ल पदी जेबा समीर शेख,असिस्टंट हेड गर्ल पदी माहिनूर आदिल शेख व हेड बॉय पदी यासीन अन्सार शेख,असिस्टंट हेड बॉय पदी जुनेद युनूस शेख हे निवडून आले

 या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडणुकीत प्राप्त केलेल्या पदांची आमदार संग्राम जगताप यांनी शपथ दिली व या पदांचे बॅच त्यांच्या हस्ते लावण्यात आले तसेच पुढील वाटचालीस आ जगताप यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, महासचिव अब्दुल रऊफ खोकर, संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, इंजि. इकबाल शेख, विकार काझी, शब्बीर अहमद, प्राचार्य फिरोज अली आदीसह पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या शेख यांनी केले आभार अब्दुल रऊफ खोकर यांनी मानले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here