इम्तियाज मोमिन,कोल्हापूर : कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येनंतर बदलापूर येथील एका शाळेत सफाई कामगारानं दोन अल्पवयीन मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद बदलापूरसह संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत.
हे दोन्ही प्रकरण ताजी असताना कोल्हापूरातून धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापूरच्या शियेमध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. बदलापुरातील घटना ताजी असताना कोल्हापुरातील घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेपूर्वी पीडित मुलगी बुधवारी (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
कोल्हापुरातील दहा वर्षीय चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही २१ ऑगस्टच्या दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर संकुलात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरात आजपासून कन्या भगिनी वाचनपूर्ती सोहळा कार्यक्रम सुरू होताच महायुतीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे राज्यातील मुली सुरक्षित आहेत की नाही? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी 10 वर्षीय मुलीच्या हत्येबाबत माहिती देताना सांगितले की, शिरोली एमआयडीसी हद्दीमध्ये रामनगर इथे तीन वर्षांपूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं. गुड्डू सिंग अग्रहरी हा कुटुंबप्रमुखाचा मुलगा आहे. गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी एमआयडीसी कंपनीत मजूर म्हणून काम करते. बुधवारी सकाळी ८ वाजता दोघंही कामाला गेले. त्यांच्या घरात मुलांचा मामाही सोबत राहतो. त्यांना तीन मुली आणि दोन मुलं अशी एकूण पाच मुलं आहेत.
या अल्पवयीन मुलीचे आई-वडील शिरोली औद्योगिक वसाहतीतील कमला या खासगी कंपनीत कामाला आहेत. बुधवारी सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलगी कुठेच दिसली नाही. त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या व नातेवाईकांची चौकशी केली. तरीही ती कुठेच सापडली नाही. मुलीच्या बाबतीत विचारणा केली असता, की मुलीने दुपारी जेवण केलं आणि ती मोबाईल घेऊन बसली होती. त्यानंतर मला कामावर जायचं असल्याने मी झोपलो. मात्र त्यानंतर ती मोबाईल ठेवून कधी घरातून निघाली हे माहित नसल्याचं त्याने सांगितलं. मुलगी बुधवारी दुपारपासून घरातून गायब झाली होती.
रामनगर येथील दहा वर्षीय परप्रांतीय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी बुधवारी रात्री शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक रहिवाशांसोबत शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि परिसातील शेतातील विहिरी, ओढे, ऊसाच्या शेतात देखील तपास केला होता. पण कोणताच सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सकाळी चार वाजेपर्यंत पोलीस तपास घेत होते.
त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीन घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर येथील एका छोट्या शेडमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी प्राथमिक माहितीनुसार, मुलीच्या अंगवार ड्रेसमध्ये होता, पण बाजूला फक्त चप्पल व अंतवस्त्र दिसत होते. पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, मुलीवर अत्याचार झाल्याचा संशयही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपासानंतरच निष्कर्ष काढला जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. फॉरेन्सिक टीमला पाचारण केले असून पुढील तपास सुरू आहे.